ड्रग्स व्यवहार रोखण्यास भाजप सरकारला अपयश, विद्यार्थी परिषदेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 10:22 PM2018-06-28T22:22:23+5:302018-06-28T22:22:41+5:30
किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
पणजी - किनारी भागात अंमली पदार्थांचे व्यवहार वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
विद्यार्थी परीषदेचे संयोजक हृषिकेश शेटगावकर यांनी संघटनेच्या पणजी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, ‘ विद्यार्थी परिषदेच्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आढळून आले आहे. विद्यार्थी अर्ध्यावर शिक्षण सोडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ड्रग्स सारख्या व्यवहारात युवक अडकले गेले असल्यामुळेच त्यांनीशिक्षण अर्ध्यावर सोडण्यात आल्याचे पहाणीतून आढळून आले आहे. हे अत्यंत घातक असून युवक भरकटत चालला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
ड्रग्स लॉबीवर अंकूश ठेवण्यास सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीचीही सरकारे आणि विद्यमान भाजप सरकारही त्याला जबाबदार असल्याचा आरोप शेटगावकर यांनी केला.
पोलीस कारवाईच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की, पोलीस लहान सहान ड्रग्स एजंटना पकडतात. परंतु या व्यवहाराच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे ड्रग्सचे लागेबांधे कुठपर्यंत पोहोचले याचा अंदाज मिळत नाही तसेच ही विषवल्ली मुळासकट उपसून काढणे होत नाही.
विद्यार्थी परीषदेने २०१६ मध्ये उत्तर गोव्यातील किनारी भागात सर्व्हेक्षण केले होते. विद्याथ्यांचे अनेक गट करून किनारी भागातील लोकांना भेटी देऊन ही पाहाणी करण्यात आली होती. Þड्रग्सचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आणि या दुष्टचक्रात युवक सापडत असल्याचे पाहाणीतून आढळून आले होते असे अभिदीप देसाई यांनी सांगितले.
एनआसयुआय या कॉंग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनेच्या अलिकडील ड्रग्स प्रकरणातील आरोपांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ड्रग्सच्या विरोधात लढा देण्यासाठी एनएसयुआय पुढे आली तर त्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी परीषदेचे पदाधिकारी सौरभ बोरकरही यावेळी उपस्थित होते.