SITने हडप केलेल्या जागा भाजपचे मंत्री, आमदार विकतात; 'आप'च्या अमित पालेकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 03:31 PM2024-08-08T15:31:50+5:302024-08-08T15:32:33+5:30
आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांची पत्रकार परिषद
नारायण गावस, पणजी: सरकार जे एसआयटी मार्फत जमिनी ताब्यात घेत आहेत ते भाजपचे काही मंत्री आमदार विकण्याचे काम करत आहेत. भाजपच्या एका आमदारांने आसगाव येथे अशी जमीन विकत घेतली आहे. त्याचा योग्य पुरावा आमच्याकडे आहे याेग्य वेळ आल्यावर तो जाहीर केला जाणार आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषेदत केला. यावेळी त्याच्यासोबत वाल्मिकी नाईक व जॉर्सन गोमस् उपस्थित होते.
ॲड पालेकर म्हणाले अगाेदर बिल्डर लोकांच्या जागा हडप करत होते. आता सरकारचे मंत्री आमदारच लाेकांच्या जागा हडप करत आहेत. एसआयटीने ताब्यात घेतलेल्या जमिनी परस्पर विकल्या जात आहेत. यासाठी सरकार नवनवीन कायदे आणत आहेत. नुकतेचआयपीबी विधेयक भाजपने मांडले. हे विधेयक आले तर सरकारच्या सर्व खात्याचे अधिकार काढून ते सर्व मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. नंतर मुख्यमंत्री आपल्या दलालासोबत राज्यातील सर्व जागा या रियल इस्टेट तसेच बिल्डरांना विकणार आहे. विधानसभेत विरोधकांनी या विधेयकाला विरोध केल्याने ते चिकित्सा समितीकडे पाठविले आहे. हे विधेयक आले तर गाेव्याच्या जमिनी नष्ट हाेणार आहे.
ॲड. पालेकर म्हणाले, नगर नियोजन, पंचायत, साधन सुविधा विकास मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, पंचायत या सर्वांना बाजूला ठेऊन सर्व अधिकार गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऑफ सिंगल विंडो क्लिअरन्स विधेयकाकडे जाणार आहे. याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असणार तसेच सदस्य हे मुख्यमंत्र्याच्या जवळचे असणार. या विधेयकामुळे प्रकल्पांना स्थानिक लोकांना तसेच पंचायतीला विराेध करता येणार नाही. त्यामुळे हे विधेयक खूप घातक आहे. सरकारचा डोळा फक़्त गाेव्याच्या जमिनी हडप करणे आहे हे या अधिवेशनात दिसून आले, असे ते म्हणाले.
वाल्मिकी नाईक म्हणाले, सरकार फक्त जनहित विरोधी विधेयक आणून राज्यातील जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे. पण या ३३ आमदारांना ७ विरोधी आमदारांनी धडा शिकवला. त्यांनी विरोध केल्याने सरकार अशी नको असलेली विधेयक मंजूर करु शकली नाही. सरकार फक़्त राज्यातील जमिनी नष्ट करु पाहत आहेत हे दिसून आले. पण या अधिवेशनात खरोखरच आपचे आमदार तसेच इतर विरोधी आमदारांनी चांगली कामगिरी केली. सरकारचे विविध भ्रष्टाचार तसेच अन्य कारनामे विधानसभेत मांडले हीच खारी लाेकशाही आहे, असे ते म्हणाले.
वाल्मिकी म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांनी अधिवेशनात प्रत्येक वेळी आपचे अध्यक्ष व दिल्लीचे आमदार अरविंद केजरीवाल यांच्यावर काही आरोप केले आहेत त्याचा आम्ही पक्षातर्फे निषेध करता.