गोवा विद्यापीठ निवडणुकीत भाजपा पुरस्कृत गट विजयी, एनएसयूआयचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 02:13 PM2017-10-16T14:13:32+5:302017-10-16T14:14:07+5:30
गोवा विद्यापीठाच्या अत्यंत चर्चेच्या आणि वादाच्या ठरलेल्या निवडणुकीत सोमवारी भाजपा पुरस्कृत विद्यार्थी गट विजयी झाला. विरोधात उमेदवारी सादर न झाल्याने पूर्ण गट बिनविरोध निवडून आला.
पणजी : गोवा विद्यापीठाच्या अत्यंत चर्चेच्या आणि वादाच्या ठरलेल्या निवडणुकीत सोमवारी भाजपा पुरस्कृत विद्यार्थी गट विजयी झाला. विरोधात उमेदवारी सादर न झाल्याने पूर्ण गट बिनविरोध निवडून आला. खुल्या पद्धतीने निवडणूक घ्यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा ही मागणी मान्य न झाल्याने एनएसयूआय आणि अन्य विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. एवढेच नव्हे तर निषेधार्थ सोमवारी विद्यापीठात एनसयूआयने आंदोलनही केले.
भाजपाने आपली पूर्ण शक्ती या निवडणुकीत वापरली. विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष म्हणून उर्वेश रेडकर वेलिंगकर हे निवडून आले. सरचिटणीसपदी निषिकर राऊत देसाई विजयी झाले. महिला प्रतिनिधी म्हणून शांभवी गाडगीळ हिने बाजी मारली. सदस्यपदी संदेश पालकोंडा, दत्तप्रसाद देसाई, जोजफ लोबो, कृष्णा गावस, सुमेध आठल्ये व बालकृष्ण थळी हे विजयी झाले.
आंदोलक विद्यार्थी