भाजप प्रशिक्षण शिबिराचा घेतला नगसेवकांनी लाभ: राज्यभरातील नगरसेवकांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:16 PM2023-11-04T14:16:10+5:302023-11-04T14:17:19+5:30
नारायण गावस पणजी: राज्यातील सर्व नगरसेेवकांनी आपल्या प्रभागातील लोकांना सरकारी सेवांचा लाभ करुन द्यावा तसेच आपल्या प्रभागाचा कशा प्रकारे ...
नारायण गावस
पणजी: राज्यातील सर्व नगरसेेवकांनी आपल्या प्रभागातील लोकांना सरकारी सेवांचा लाभ करुन द्यावा तसेच आपल्या प्रभागाचा कशा प्रकारे विकास करावा अशा विविध विषयांवर गोवा भाजप पक्षातर्फे नगरपालिका सदस्य प्रशिक्षण कार्यशाळा पणजीत आयाेजित केली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाला राज्यसभेचे खासदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत मंत्री सुभाष शिरोडकर, रवी साठे, भाजपचे नेते ॲड. नरेंद्र सावईकर, गाेविंद पर्वतकर, सर्वानंद भगत अशा विविध पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
- नगरसेवकांनी प्रभागाचा प्रोफाईल करावा
प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागाचा प्रोफाईल करणे गरजेचे आहे. आपल्या प्रभागात किती घरे आहेत? किती घरांमध्ये किती लोक राहतात? कुणाच्या घरात सरकारी नाही याचा तपशील घ्यावा. तसेच ज्या लोकांना सरकारच्या योजना मिळत नाही अशा लोकांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. अशी विविध कामे केली तरी आपला प्रभाग मजबूत करु शकतात. मी माझ्या मतदारसंघाचा सर्व प्रकारचा तपशील ठेवत आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रत्येक घराची माहिती आहे. नगरसेवकांनी अशाच प्रकारे माहिती ठेवणे गरजेचे आहे, असे सहकार मंत्री सुभाष शिराेडकर यांनी सांगितले.
जनतेच्या बळावर आपण आज या पदावर पाेहचलो याचे भान ठेवावे. अशा विविध उपक्रमातून ज्ञान मिळत असते. नगरसेवकांना या ज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या प्रभागामध्ये विकास करावा. या प्रशिक्षणाचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळत आहे. चांगले प्रशिक्षण हे नेहमी जीवनशैलीत बदल करत असते. एक नगरसेवक म्हणून निवडून येणे साेपी गाेष्ट नसते. यासाठी लोकांची मन जिंकणे गरजेचे आहे, असे मंत्री सुभाष शिराेडकर म्हणाले.
प्रत्येक वर्षी भाजप असे प्रशिक्षण शिबिर राबवित असते. यातून नगरसेवकांचा विकास होतो. तसेच त्यांना आपल्या लोकांशी कशा प्रकारे संवाद साधावा याची माहिती मिळते. राज्यभरात ज्या नगरसेवकांनी सहभाग घेतला त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. मुख्यमंत्री मध्यप्रदेशमध्ये हाेणाऱ्या निवडणूकांच्या प्रचारात व्यस्थ असल्याने उपस्थित राहू शकले नाही. तरीही इतर मार्गदर्शकांचे चांगले मार्गदशन लाभणार. या शिबिरात तुमचा मानसिक विकास होणार आहे. राजकारणाचे मूळ समजणार आहे, असे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.