मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप

By पंकज शेट्ये | Published: April 24, 2023 08:01 PM2023-04-24T20:01:04+5:302023-04-24T20:01:25+5:30

नगरसेवक विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत यांनी भरला अर्ज

BJP vs BJP for the post of Sub-President in Murgaon | मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप

मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक रामचंद्र कामत आणि नगरसेवक विनोद कीनळेकर या दोघांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मुरगावचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी मंगळवारी (दि.२५) पालिका सभागृहात बैठक होईल. रामचंद्र कामत आणि विनोद कीनळेकर हे दोन्ही नगरसेवक भाजपचे असून ते एकमेकाच्या विरोधात उपनगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्याने सद्या उपनगराध्यक्ष पदाची लढत भाजप विरुद्ध भाजप अशा सारखी झालेली आहे. मंगळवारी मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार हे अजून स्पष्ट झाले नसलेतरी उपनगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी एका नगरसेवकाला भाजप नेते अर्ज मागे घेण्यास सांगणार असल्याची शक्यता आहे. 

काही दिवसापूर्वी अमेय चोपडेकर यांनी मुरगावच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त झाले होते. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी गटातील नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार अमेय यांचा एका वर्षाचा उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मुरगावच्या उपनगराध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्यासाठी सोमवारी (दि.२४) दुपारी १२ पर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा वेळ ठेवला होता. मुरगाव नगरपालिकेतील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार अमेय चोपडेकर नंतर प्रभाग २३ चे नगरसेवक विनोद कीनळेकर यांना उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्याचे सत्ताधारी गटातील नगरसेवकातील अलिखीत करारात ठरले होते. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक विनोद कीनळेकर बरोबर सत्ताधारी गटातील नगरसेवक रामचंद्र कामत (प्रभाग ७) यांनीही उपनगराध्यक्षासाठी अर्ज भरल्याने येथील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत हे दोघेही भाजप नगरसेवक असून दोघांनीही अर्ज भरल्याने उपनगराध्यक्षाच्या निवडीसाठी सद्या भाजप विरुद्ध भाजप असे चित्र झाल्याचे अनेकात बोलले जात आहे.

उपनगराध्यक्षासाठी दोघेही भाजप नगरसेवक रिंगणात उतरल्याने भाजप विरुद्ध भाजप न व्हावे आणि निवड बिनविरोध व्हावी यासाठी वरिष्ठ नेते एका नगरसेवकाला अर्ज मागे घेण्यास सांगून उपनगराध्यक्षाची निवड बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता जास्त आहे. मंगळवारी उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार ते निकाल घोषित झाल्यानंतरच स्पष्ट होईल, मात्र रामचंद्र कामतची बाजू उपनगराध्यक्ष बनण्यासाठी जास्त भारी असल्याची चर्चा अनेक नगरसेवकात सद्या आहे.

Web Title: BJP vs BJP for the post of Sub-President in Murgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा