घराणेशाहीबाबतचा आपला नियम भाजपा गोव्यात मोडणार, कुटुंबात एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 06:03 PM2021-09-20T18:03:34+5:302021-09-20T18:06:53+5:30

Devendra Fadnavis, Goa BJP News: काही भाजप आमदार आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत याकडे लक्ष वेधले असता पत्रकार परिषदेत उत्तर देताना फडणवीस यांनी हे विधान केले

BJP will break its rule on dynastic rule in Goa, will nominate more than one person in the family, hints Devendra Fadnavis | घराणेशाहीबाबतचा आपला नियम भाजपा गोव्यात मोडणार, कुटुंबात एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

घराणेशाहीबाबतचा आपला नियम भाजपा गोव्यात मोडणार, कुटुंबात एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

Next

पणजी - कुटुंबातील एकाच व्यक्तिला तिकीट हे भाजपचे धोरण आहे परंतु गोवा याला अपवाद असू शकतो. कुटुंबात कितीजणांना उमेदवारी द्यावी तसेच युतीबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळच घेईल, असे भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. काही भाजप आमदार आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत याकडे लक्ष वेधले असता पत्रकार परिषदेत उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘ गोव्यात वेगळ्या प्रकारचे अपवाद वर्षोन्वर्षे चालत आले आहेत. याआधीही असे अपवाद येथे आहेत.’ (BJP will break its rule on dynastic rule in Goa, will nominate more than one person in the family, hints Devendra Fadnavis)

‘आमदार का फुटले?काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे’
येत्या निवडणुकीसाठी भाजप अन्य पक्षाकडे युती करणार आहे का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, यासंबंधी निर्णय संसदीय मंडळ घेईल. भाजपने नेहमीच रीती आणि नीतीचे राजकारण केले आहे. काँग्रेसचे आमदार फुटून भाजपने का आले याचे आत्मपरीक्षण काँग्रेसने करायला हवे.’
फडणवीस म्हणाले की, ‘ अलीकडेच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये तसेच त्याआधी जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही भाजपला लोकांनी बहुमताने निवडून दिले आहे.’ एका प्रश्नावर ते म्हणाले की, ‘ दिवंगत पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यानी बºयापैकी कामगिरी बजावली आहे. कोविड महामारीच्या काळात त्यांनी चोख काम केले. शंभर टक्के लसीकरणाचा मान गोव्याने मिळवला.’प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री असतील का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की,‘ त्याबाबतचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच संसदीय मंडळ घेणार आहे.’

 ‘ भाजपमध्ये बंडाळी नाहीच’
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बंडाळी असल्याचे वृत्त फडणवीस यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, ‘ मनभिन्नता असू शकते, परंतु बंडाळी निश्चितच नाही. पक्ष आणि सरकार एकत्रित चेहरा म्हणून लोकांसमोर जाईल. मुख्यमंत्री, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वचजण एकदिलाने वावरणार असून यावेळी पूर्ण बहुमताने ऐतिहासिक विजय भाजपला मिळणार आहे.’

 पर्रीकरांची उणीव भासेल
फडणवीस म्हणाले की,‘येत्या निवडणुकीत दिवंगत पर्रीकर आमच्यासोबत नाहीत ही उणीव भासेल. परंतु पर्रीकरांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनीही चांगली कामगिरी बजावली आहे. पर्रीकरांनी विकासाची मुहुर्तमेढे रोवली ती सावंत पुढे नेत आहेत. पर्यटन आणि रोजगार निर्मिती यातून राज्याला विशेष फायदा होणार आहे. ‘प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमातून सरकार जनतेशी थेट कनेक्ट होत आहे. गोवा भाजप निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत आहे. 

Web Title: BJP will break its rule on dynastic rule in Goa, will nominate more than one person in the family, hints Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.