'सावर्डे, काणकोण, फोंडा, शिरोडा, मडकई व सांगेत मोठे मताधिक्क्य भाजपला मिळेल'
By किशोर कुबल | Published: May 8, 2024 02:02 PM2024-05-08T14:02:01+5:302024-05-08T14:02:14+5:30
मुख्यमंत्र्यांचा दावा : पल्लवी ६० हजारांहून अधिक तर श्रीपाद १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजयी होतील
किशोर कुबल/पणजी
पणजी : उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्क्य मिळेल व ते एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील तसेच दक्षिणेत केवळ ६ मतदारांसंघात थोडेसे मागे असलो तरी सावर्डे, काणकोण, फोंडा, शिरोडा, मडकई व सांगे या मतदारसंघांमध्ये मोठे मताधिक्क्य भाजपला मिळेल. पल्लवी धेंपे ६० हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवून विजयी होतील, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले कि,‘ संपूर्ण गोव्यात कॉग्रेसचे अस्तित्त्व आता केवळ चार विधानसभा मतदारसंघांपुरतेच सिमीत राहिलेले आहे. कॉग्रेसने यावेळी प्रचारात केवळ जाती, धर्माचे राजकारण केले. भाजप नेहमीच विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढतो. त्यांच्याकडे सांगण्यासारखा एकही मुद्दा नव्हता. गोव्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते.
मुख्यमंत्री म्हणाले की,‘ काल मतदान केंद्रांबाहेर कॉग्रेसच्या टेबलांवर माणसेच नव्हती. त्यांची दयनीय स्थिती होती. आमच्या उमेदवारांचा केवळ अपप्रचार त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर आरोप केले. गोव्यातील जनतेने त्यांना साथ न देता भाजपला मतदान केले. भाजप आमदार, मंत्री कार्यकर्ते यांनी निस्वार्थ भावनेने काम केले. मोदींच्या सभेनंतर वेगळे वातवारण येथे निर्माण झाले.
श्रीपाद नाईक यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले कि,‘ आमदार, मंत्री, पंच, सरपंच यांनी स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणेच काम केले.