भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, आगामी रणनीतीवर चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:18 AM2021-09-20T00:18:29+5:302021-09-20T00:19:03+5:30

Devendra Fadnavis News: भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या सोमवारी २0 रोजी दोन दिवसांच्या दौºयावर गोव्यात दाखल होत आहेत.

BJP's election in-charge Devendra Fadnavis will discuss the upcoming strategy during his two-day visit to Goa | भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, आगामी रणनीतीवर चर्चा करणार

भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, आगामी रणनीतीवर चर्चा करणार

Next

पणजी : भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या सोमवारी २0 रोजी दोन दिवसांच्या दौºयावर गोव्यात दाखल होत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी फडणवीस गोवा दौºयावर येत आहेत. (BJP's election in-charge Devendra Fadnavis will discuss the upcoming strategy during his two-day visit to Goa)

फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी तसेच पक्षाचें गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत. सहप्रभारी कें द्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झालेल्या आहेत. येत्या चार पाच महिन्यात गोव्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने पक्षाच्या तयारीचा आढावाही घेतला जाईल. फडणवीस तसेच वरील अन्य नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्रीमंडळातील त्यांचे अन्य सहकारी, भाजप आमदार, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. भाजप युवा आघाडी, महिला मोर्चा, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आदी आघाड्यांबरोबरच बूथ स्तरावरही ते संवाद साधतील.

फडणवीस यांनी बिहार विधानसभेत निवडणूक प्रभारी म्हणून भाजपसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. २0१४ ते २0१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. याआधीही अनेकदा ते निवडणुकांच्यावेळी गोव्यात आलेले आहेत आणि निवडणुकीची जबाबदारीही निभावली आहे. त्यांचा हा अनुभव गोवा भाजपला फार उपयोगी पडेल, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: BJP's election in-charge Devendra Fadnavis will discuss the upcoming strategy during his two-day visit to Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.