रानडे यांच्या पार्थिवावर गोव्याच्या मंत्र्यांकडून पुष्पांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 07:54 PM2019-06-25T19:54:32+5:302019-06-25T19:54:51+5:30
रानडे अलिकडे आजारी असायचे. पुणे येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पणजी : गोवा मुक्ती संग्रामात फार मोठी कामगिरी बजावलेले आणि पोतरुगीजांविरुद्ध सश लढय़ाचा मार्ग पत्करत त्यासाठी चौदा वर्षे तुरुंगवास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे मंगळवारी पुणो येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 9क् वर्षाचे होते. रानडे यांच्या योगदानाची जागतिक इतिहासानेही यापूर्वी नोंद घेतलेली आहे.
रानडे अलिकडे आजारी असायचे. पुणे येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही वर्षापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रानडे यांची प्राणज्योत मालवली. गेली बरीच वर्षे रानडे सातत्याने गोव्यात यायचे. गोव्यात त्यांचे अनेक मित्र व चाहते होते. रानडे हे मूळचे महाराष्ट्रातील सांगलीमधील असले तरी, त्यांनी गोवा मुक्ती चळवळीत योगदान देण्याचा निर्धार केला व पोतरुगीजांचा अत्याचारही सहन केला. वीर सावरकरांपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. गोवा मुक्ती संग्रामाच्या काळात 1955 साली रानडे यांना पोतरुगीज पोलिसांनी अटक करून लिस्बनच्या तुरुंगात ठेवले होते. गोवा जरी 1961 साली मुक्त झाला तरी, रानडे यांची तुरुंगातून मुक्तता होण्यास 1969 साल उजाडावे लागले.
रानडे यांचे योगदान गोवा कधीच विसरणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मंत्र्यांनी रानडे यांना श्रद्धांजली वाहिली. 2क्क्1 साली रानडे यांना पद्मी जाहीर करण्यात आली.
गोव्याचे नगर विकास मंत्री मिलिंद नाईक व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी मंगळवारी पुणो येथे भेट दिली. तिथे रानडे यांच्या पार्थिवाचे त्यांनी अंत्यदर्शन घेतले. वैकुंठ स्मशानभूमी, पुणो येथे त्यांनी रानडे यांच्या पार्थिवावर पुष्पांजली वाहिली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी खासदार प्रदीप रावत, अॅड. दादा बोंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.
जागतिक इतिहासात नोंद
जुलमी पोतरुगीज सत्तेविरुद्ध रानडे यांनी सश लढा दिला. त्यांची नोंद जागतिक इतिहासात झालेली आहे. दीर्घकाळ
कोठडीत कारावास भोगलेल्या क्रांतिकारकांच्या मांदियाळीत त्यांचे नाव कोरले गेले आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी श्रद्धांजली वाहिली. भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी नव तरुणांना त्यांचे त्यागमय जीवन स्फुर्ती देत राहील, असे खलप यांनी म्हटले आहे.
प्रेरणादायी जीवन : लेले
रानडे यांच्या निधनाची बातमी खूपच वाईट आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान खूप आहे. गोव्यात त्यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले आहे व त्या माध्यमातून अनेकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास प्रेरणा दिली. त्यांचे जीवन माङयासारख्यांना सतत प्रेरणादायी राहीले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नाकर लेले म्हणाले.