खोल समुद्रात नौका उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:04 PM2019-04-25T23:04:11+5:302019-04-25T23:04:28+5:30

नौकेवर पर्यटक तसेच कर्मचारी असल्याचे परब यांनी सांगून त्यांचा जीव धोक्यात असल्याचे आम्हाला कळताच त्वरित त्यांच्या सुरक्षेसाठी आमच्या दोन नौका बचाव कार्यासाठी पाठवल्याचे सांगितले.

The boat sank in the deep sea, luckily surviving | खोल समुद्रात नौका उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली

खोल समुद्रात नौका उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली

Next

वास्को: डोना पाऊला, पणजी येथून सुमारे २० पर्यटकांना घेऊन बायणा किनाऱ्यापासून खोल समुद्रातील एका बेटावर पर्यटकांना विविध जलक्रीडाचा आनंद लुटण्यासाठी घेऊन आलेली नौका परतीच्या वाटेवर असताना मोठ्या ल्हाटामुळे उलटल्याने बायणा किना-याच्या परिसरात गुरूवारी (दि.२५) भितीचे वातावरण निर्माण झाले. प्रवासी तसेच नौकेवर काम करणा-या कर्मचाऱ्यांचा जीव नौका उलटल्याने धोक्यात असल्याची माहीती मुरगाव लांच मालक संघटनेच्या सदस्यांना मिळताच त्यांनी त्वरित बायणा किना-यावरून आपल्या दोन नौका पाठवून नौकेसहित त्याच्यावर असलेल्या कर्मचा-यांना सुखरूपरित्या घेऊन ते बायणा किना-यावर पोहोचले.

नौका उलटून त्याच्यावर असलेल्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याचे कळताच त्या नौकेवर असलेल्या कर्मचा-यांनी समुद्रातील इतर नौकांची मदत घेऊन पर्यटकांना नंतर सुखरुप रित्या पुन्हा डोना पाऊला येथे पाठविले असून सुदैवाने ह्या घटनेत कुठल्याच प्रकारची जीवीत हानी झाली नाही. गुरूवारी (दि. २५) संध्याकाळी ३.३० च्या सुमारास सदर घटना घडली. डोना पाऊला भागातून ‘स्कूबा डायव्हींग’ व इतर जलक्रीडा करण्यासाठी पर्यटकांना घेऊन एका बेटवर (बेट आयलेंण्ड) येणारी नौका परतीच्या वाटेवर असताना भयंकर अशा ल्हाटामुळे समुद्रात उलटल्याची माहीती मुरगाव लांच मालक संघटनेचे सदस्य स्वप्नेश परब यांनी दिली.

ह्या नौकेवर पर्यटक तसेच कर्मचारी असल्याचे परब यांनी सांगून त्यांचा जीव धोक्यात असल्याचे आम्हाला कळताच त्वरित त्यांच्या सुरक्षेसाठी आमच्या दोन नौका बचाव कार्यासाठी पाठवल्याचे सांगितले. बायणा किना-यापासून खोल समुद्रात ‘जापानीज गार्डन’ च्या खाली असलेल्या समुद्रात ही घटना घडल्याचे परब यांनी माहीतीत सांगून आमच्या दोन नौकेबरोबर पाणबुडे बचावासाठी पाठविल्याची माहीती त्यांनी दिली. तसेच बायणा समुद्र किना-यावर असलेल्या दृष्टी आस्थापनाच्या जीवरक्षकांनी त्या नौकेवर असलेल्या लोकांच्या बचावासाठी धाव घेतली अशी माहीती त्यांनी दिली.

सदर नौका उलटून त्यात पाणी शिरत असल्याचे नौकेवर असलेल्या कर्मचा-यांना दिसून येताच त्यांनी त्वरित समुद्रात असलेल्या अन्य नौकांची मदत घेऊन याच्यावर असलेल्या पर्यटकांना सुखरूप रित्या त्यांच्यावर घालून दोनापैला पाठविल्याची माहिती त्यांनी दिली. मुरगाव लांच मालक संघटनेच्या दोन्ही नौका उलटलेल्या नौकेशी पोचल्यानंतर त्याच्यावर असलेल्या कर्मचा-यांना सुरक्षा देऊन नंतर उलटलेली नौका सुखरूप रित्या बायणा किना-यावर आणून नांगरण्यात आल्याची माहीती स्वप्नेश परब यांनी शेवटी दिली. बचाव कार्यासाठी समुद्रात गेलेल्या दृष्टी कंपनीच्या एका कर्मचा-याला पत्रकारांनी ह्या घटनेबाबत विचारले असता बायणा किना-यावरून बचाव कार्यासाठी पोचण्यापूर्वीच ह्या नौकेवरील पर्यटकांना दुस-या नौकेत घालून सुखरूप रित्या दोनापौला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सुदैवाने सदर नौकेवर असलेल्या कोणालाच कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचे त्या कर्मचा-यांने माहीतीत पुढे सांगितले. खोल समुद्रात उलटलेल्या त्या नौकेवरील कर्मचारी नौकेसहीत संध्याकाळी बायणा किना-यावर पोचल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले असता आमच्या नौकेवर घटना घडलेल्या वेळी कुठलाच पर्यटक नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आमच्या नौकेत कामाला असलेले कर्मचारी फिरायला समुद्रात आलो असताना ही घटना घडली असून यातून सर्वजण सुखरुप रित्या बचावले असे त्यांनी माहितीत सांगितले.

बायणा किना-यापासून खोल समुद्रात एक नौका उलटलेली असल्याची माहीती मुरगाव तसेच वास्को पोलीसांना मिळताच दोन्ही पोलीस स्थानकाच्या अधिका-यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन याबाबत माहीती घेतली. नौका उलटली तरी सुदैवाने कुठल्याच प्रकारची जीवीत हानी झाली नसून उलटलेली नौका सुद्धा किना-यावर आणून नांगरण्यात आल्याचे पोलीसांना स्पष्ट झाल्यानंतरच ते येथून निघून गेले.

Web Title: The boat sank in the deep sea, luckily surviving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे