१० लाखांची लाच देऊन मिळविली बोगस एनओसी
By admin | Published: May 5, 2015 01:07 AM2015-05-05T01:07:01+5:302015-05-05T01:07:11+5:30
खाण व्यावसायिक प्रसन्न घोडगे यांनी १० लाख रुपयांची लाच देऊन खनिज निर्यातीसाठी बोगस एनओसी मिळविल्याचे उघड झाले आहे
वासुदेव पागी ल्ल पणजी
खाण व्यावसायिक प्रसन्न घोडगे यांनी १० लाख रुपयांची लाच देऊन खनिज निर्यातीसाठी बोगस एनओसी मिळविल्याचे उघड झाले आहे. ही बोगस एनओसी खाण खात्याचे ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीस यांनी बनविली होती. फ्रॉस्ट इंटरनॅशनल प्रकरणात एसआयटीकडून दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
फ्रॉस्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलेल्या बोगस एनओसी प्रकरणातील खरे मास्टरमाइंड प्रसन्न घोडगे आणि खाण खात्याचे ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीस हेच आहेत. गोन्साल्वीस यांनी १० लाख रुपये लाच घेऊन ही बोगस एनओसी बनविली होती आणि घोडगे यांनी गोन्साल्वीसला १० लाख रुपये रोख
रक्कम दिली होती. या व्यवहाराची साक्ष देणारे साक्षीदारही एसआयटीने मिळविले आहेत आणि त्यांच्या साक्षी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झालेल्याही आहेत. एसआयटीतर्फे पणजी भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयात (सत्र न्यायालयात) या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात या व्यवहारांचा उल्लेख करण्यात आला आहे.(पान ८ वर)