उद्यापासून ७ दिवस स्वत:ला सांबाळा, अजूनही हीटवेवच्या रडारवर गोवा
By वासुदेव.पागी | Published: April 4, 2024 03:54 PM2024-04-04T15:54:06+5:302024-04-04T15:56:46+5:30
३६ अंश सेल्सीयसपेक्षा अधिक तापमान जाऊ शकते असे अंदाजात म्हटले आहे.
वासुदेव पागी, पणजीः ५ एप्रिल ते ११ एप्रिल हा ११ दिवसांचा काळ संपूर्ण देशासाठीही आणि गोव्यासाठीही कसोटीचा ठरणार आहे. या काळात देशात ज्या राज्यात उष्म्याच्या लाटेची शक्यता असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे त्यात गोव्याचाही समावेश आहे. ३६ अंश सेल्सीयसपेक्षा अधिक तापमान जाऊ शकते असे अंदाजात म्हटले आहे.
रणरणते ऊन आणि नसोसवणाऱ्या उष्म्याला सामोरे जाण्याची शक्यता पुढील आठवड्यात सोसावी लागण्याची शक्यता आहे. देशात उष्म्याची लाट अनेक ठिकाणी आहे आणि येत्या काही दिवसात ती अनेक ठिकाणी पसरू शकते असे हवामान खात्याने वर्तविले आहे. उष्म्याची लाट कुठे कुठे येवू शकते हे दर्शविणारा नकाशा हवामान खात्याने बनविला असून उष्म्याची लाट येण्याची शक्यता असलेले क्षेत्र हेलाल रंगाने दाखविण्यात आले आहे. या लाल रंगात गोव्याचाही समावेश आहे.
वास्तविक किनाऱ्या लगतच्या भागात हवेत आर्द्रता असल्यामुळे उष्णता ही फार वाढत नसते आणि थंडीही फार वाढत नसते. यावेळी गोव्यात उष्णता ३६ अंशपेक्षा वर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान गोव्यात गुरूवार दि.४ एप्रील रोजी कमाल तापमान हे अंशसेल्सियस इतके होते. त्यामुळे गोव्यात तापमान वाढलेच तरी ते एकदम न वाढता दोन तीन दिवस तरी लागतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हीट वेवचे निकष
उष्म्याची लाट ठरविण्याचे काही निकष आहेत आणि वेगवेगळ्या भागात त्या भागातील भौगोलिक रचनेनुसार ते निकष वेगवेगळे असतात. लडाख सारख्या रणरणत्या उन्हाच्या भागात ४५ अंश सेल्सीयस तापमान पोहोचले उष्म्याची लाट. जाहीर केली जाते. गोव्यात कमाल तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सीयस वाढणे किंवा कमाल तापमान हे ३७ किंवा त्याहून वर गेले तर गोव्यात उष्म्याची लाट जाहीर केली जाते.