गोव्याच्या काजूची ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे, मुख्यमंत्र्यांचे आंतराष्ट्रीय काजू परिषदेत उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 05:14 PM2024-06-14T17:14:40+5:302024-06-14T17:16:02+5:30
...त्यामुळे गाेमंतकीय काजूची खास ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे आहे, असे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
नारायण गावस -
पणजी: राज्यातील काही कारखानदार आफ्रिकन देशातील कमी दरात मिळत असलेल्या काजू बिया आणून गोवन काजू म्हणून विकले जात आहे. त्यामुळे अस्सल गोमंतकीय शेतकऱ्यांच्या काजू बियांना चांगला दर मिळत नाही. त्यामुळे गाेमंतकीय काजूची खास ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे आहे, असे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
काजू आणि कोको विकास संचालनालय, कोची (केरळ) व कृषी संचालनालय (गोवा), गोवा फलोत्पादन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन दोनापावला येथे आयोजित केलेल्या काजूवर आधारित राष्ट्रीय परिषदच्या उद्घाटनाला प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते या परिषदेत उद्घाटन करण्यात आले. रविवारीही काजू विषयावर चर्चा सत्र होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले गोव्याचा काजू हा आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी आम्ही विविध याेजना देत असतो. तसेच शेतकऱ्यांसाठी खास आधारभूत किमतही दिली जाते. पण आता राज्यात आफ्रिकन काजू आणून तो गाेवन काजू म्हणून विकला जात आहे. त्यासाठी आता खास गाेमंतकीय काजूचे ब्रॅडिंग होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, काजू पासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला जीआय टॅग मिळाला आहे तसेच आता हुर्राक आणि काजू गरालाही जीआय टॅग मिळणार आहे. यामुळे गाेव्याची काजू फेणी जगभर प्रसिद्ध झाली आहे. काजू गर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे. काजू उत्पादन वाढ आणि त्यासमोरील आव्हाने हा परिषदेचा प्रमुख विषय आहे. या परिषदेला देशभरातून सुमारे २५० ते ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. काजू विषयावर विविध चर्चासत्राचा त्या घेतली जात आहेत. त्यासाठी काजू क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण करण्यात आले असून त्यांची व्याख्याने व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे.
गोवा राज्यात काजू हे प्रमुख पीक असून अनेक शेतकरी त्या पिकावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात तर अनेक कुटुंबे काजूवर अवलंबून आहेत. गोव्यातील काजू शेतकऱ्यांनी या परिषदेस हजेरी लावावी असे आवाहन कृषी खाते संचालक संदीप फळदेसाई यांनी केले आहे. 'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे.