ब्रेक्झिटचा फटका - गोमंतकियांना दुहेरी नागरिकत्व द्या: काँग्रेस

By admin | Published: June 25, 2016 01:51 PM2016-06-25T13:51:51+5:302016-06-25T13:51:51+5:30

गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्वाची सुविधा मिळवून द्यावी अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष लुईझीन फालेरो यांनी केली आहे.

Breakage blow - Give dual citizenship to Gomantakia: Congress | ब्रेक्झिटचा फटका - गोमंतकियांना दुहेरी नागरिकत्व द्या: काँग्रेस

ब्रेक्झिटचा फटका - गोमंतकियांना दुहेरी नागरिकत्व द्या: काँग्रेस

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 25 -  गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्वाची सुविधा मिळवून द्यावी अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष लुईझीन फालेरो यांनी केली आहे.
ब्रेक्सीट नंतर उत्पन्न झालेल्या परिस्थिती विषयी बोलताना फालेरो यांनी सांगितले की गोमंतकीय लोक  पोर्तुगीज नागरिकत्व घेवून मोठ्या संख्येने इंग्लंमध्ये काम धंद्यासाठी स्थायिक झाले आहेत. आता इंग्लंड युरोपियन महासंहघातून बाहेर पडल्यामुळे या लोकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामधंद्यासाठी ते पोर्तुगीज नागरिकत्व घेवून इंग्लंडमध्ये स्थाईक झाले असले तरी ते भावनिक दृष्टया बारताशीच आणि पर्यायाने गोव्याशीच जोडलेले आहेत. कारण त्यांचे कुटुंब - परिवार गोव्यातचगोव्या आहे. नव्या घडमेडीमुळे ते संभ्रमित झाले आहेत. त्यांना गोव्याशिवाय दुसरा आधार नाही. त्यामुळे सरकारने या लोकांना दुहेरी नागरिकत्व मिळवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सध्या उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने युके मधील भारतीय अँबसीत संपर्क करण्याची मागणी त्यांनी केली.
 
साठ हजार गोमंतकीयांना मोठा धक्का

Web Title: Breakage blow - Give dual citizenship to Gomantakia: Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.