ब्रिक्स परिषदेचे भगवेकरण

By admin | Published: October 13, 2016 05:44 AM2016-10-13T05:44:33+5:302016-10-13T05:44:33+5:30

भाजपाचे निवडणूक निशाणी असलेले कमळ ब्रिक्स परिषदेसाठी बोधचिन्ह म्हणून वापरल्याबद्दल काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी हरकत

Breaking the Brax Conference | ब्रिक्स परिषदेचे भगवेकरण

ब्रिक्स परिषदेचे भगवेकरण

Next

पणजी : भाजपाचे निवडणूक निशाणी असलेले कमळ ब्रिक्स परिषदेसाठी बोधचिन्ह म्हणून वापरल्याबद्दल काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी हरकत घेतली असून बुधवारी आल्तिनो निवडणूक आयोगाच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
सरकारने ब्रिक्स परिषदेचे भगवेकरण केले आहे, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कमळ हे चिन्ह गोठवावे, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून पक्षाचा असा प्रचार करणे गैर आहे. १९६८ च्या निवडणूक चिन्ह आदेशाचा भंग करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला. शांताराम म्हणाले की, केंद्रात भाजपा सरकारने शिक्षणातही कसे भगवेकरण आणले हे आम्ही पाहिले आहे. राजीनामा दिलेल्या एका माजी राज्यमंत्र्यानेही नंतर हे मान्य केलेले आहे.
गोव्याबरोबरच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाबमध्ये आगामी तीन-चार महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने अशा पद्धतीने आपल्या निशाणीचा वापर करणे उचित नव्हे. तीन दिवसांपूर्वी इंटरनेटवर सर्फिंग करताना ही गोष्ट आपल्या लक्षात आली त्यानंतर निवडणूक आयोगाला आपण पत्रही लिहिले. या पत्राची प्रत नावती यांना सादर केल्याचे त्यांनी सांगितले. अ. भा. काँग्रेस समितीच्या निदर्शनास आपण ही बाब आणली असून विरोधासाठी अन्य पक्षांचीही मदत घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
११ तिबेटींना अटक
ब्रिक्स परिषदेला विरोध करण्यास गोव्यात आलेल्या ११ तिबेटींना मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तिबेटीयन नॅशनल काँग्रेसच्या झेड्यांखाली ते बुधवारी कर्नाटकातून रेल्वेमार्गे गोव्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Breaking the Brax Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.