ब्रिक्स फुटबॉल - रशियाकडून चीनचा धुव्वा
By admin | Published: October 7, 2016 09:18 PM2016-10-07T21:18:19+5:302016-10-07T21:18:19+5:30
संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत रशियाने चीनचा ४-१ ने धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात त्यांनी भारताचाही पराभव केला होता. त्यामुळे हा संघ आता दोन सामन्यांत
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.07 - संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत रशियाने चीनचा ४-१ ने धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात त्यांनी भारताचाही पराभव केला होता. त्यामुळे हा संघ आता दोन सामन्यांत ६ गुणांसह अव्वल स्थानी पोहचला आहे. सामन्यात लॅपटोन डॅनियल आणि किरिल यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले. चीनचा एकमेव गोल यांग याने पेनल्टी शूटवर इन्जुरी वेळेत नोंदवला. त्यामुळे चीनच्या पराभवाचे अंतर कमी झाले.
बांबोळी येथील जीएमसी मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतील हा सामना शुक्रवारी संध्या. ४ वाजता खेळविण्यात आला. मोठ्या आत्मविश्वासाने भारलेल्या रशिया संघाने सुरुवातीपासून चीनवर वर्चस्व मिळवले. पासिंग, बचाव, आक्रमण या तिन्ही क्षेत्रांवर त्यांचा पगडा दिसून आला. अवघ्या सहाव्या मिनिटाला रशियाच्या किरील याने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली होती. दुसरीकडे, चीनने गोल नोंदवण्याचे प्रयत्न केले; मात्र त्यांना रशियाचा बचाव भेदता आला नाही. अखेर मध्यंतरापर्यंत रशियाने आघाडी कायम ठेवली. दुसºया हाफमध्ये, रशियाने आक्रमक पवित्रा घेतला. गेल्या सामन्यात भारताविरुद्ध गोल नोंदवणाºया लॅपटोन डॅनियलने चीनच्या बचावपटूला भेदत शानदार गोल नोंदवला. ६८ व्या मिनिटाला किमिल याने रशियाचा तिसरा गोल नोंदवला. ७७ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचा फायदा उठवत डॅनियल याने कोणतीही चूक न करता संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतील हा त्याचा तिसरा गोल होता. त्याआधी, ६८ व्या मिनिटाला चीनला सुवर्णसंधी मिळाली होती. यांग याने मारलेला हा फटका बारला लागून बाहेर गेला. त्यानंतर इन्जुरी वेळेतील केवळ दीड मिनिट शिल्लक असताना चीनला पेनल्टी बहाल करण्यात आली. यावर यांग याने गोल नोंदवत त्यांचे पराभवाचे अंतर कमी केले.
आफ्रिका संघ ‘टू लेट’!
स्पर्धा सुरू होऊन दोन दिवस उलटल्यानंतर १७ वर्षांखालील दक्षिण आफ्रिका संघाचे गोव्यात आगमन झाले. हा संघ गुरुवारी रात्री गोव्यात पोहचला. आफ्रिकन संघाला व्हिसा समस्येला तोड द्यावे लागले. व्हिसा उशिरा मिळाल्याने हा संघ भारतात स्पर्धेच्या उद्घाटनासही हजर राहू नव्हता. यासंदर्भात, स्पर्धेचे सीईओ राजीव भल्ला म्हणाले, की गेल्या पाच-सहा महिन्यांपासून स्पर्धेची तयारी सुरू आहे. पाहुण्या संघांना लवकरात लवकर व्हिसा मिळावा, यासाठी ‘फास्ट व्हिसा’चे प्रयत्न केले होते. संघ व्यवस्थापनाला ही प्रक्रिया आॅनलाईन करायची होती. त्यात आफ्रिका संघाला तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांना विमानतळावरून परत जावे लागले.