समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 11:18 AM2024-08-30T11:18:01+5:302024-08-30T11:19:00+5:30

साखळीत प्रारंभ, जास्तीत जास्त सदस्य करा

bring development to the last element of society reach every household through membership drive said cm pramod sawant | समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवा, सदस्यता मोहिमेद्वारे प्रत्येक घरात पोहोचा: CM सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: भारतीय जनता पार्टी हे कुटुंब असून प्रत्येकाच्या सुख - दुःखात नेहमी वाटेकरी होणाऱ्या कुटुंबात सदस्यता घेण्यासाठी त्याच्या घरोघरी जाऊन त्यांना सदस्य करा. शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना भाजप परिवारात सहभागी करणे, त्यांना सुविधा पुरवणे यासाठी भाजप कटिबद्ध आहे.

प्रत्येक घरात समृद्धी हा भाजपचा नारा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. साखळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अंत्योदय तत्त्वानुसार शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

प्रत्येक घरात भाजपचे सदस्य निर्माण व्हावेत, यासाठी सर्वाधिक प्रयत्न करा. लोकांशी सतत संपर्कात राहणे, हा भाजपचा अजेंडा आहे. विकसित भारत, विकसित गोवा, यासाठी सर्वांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन करून आम्ही प्रत्येकाला समृद्ध देण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य करून भाजपची शक्ती व परिवार अधिक मजबूत करावा, असे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर सुलक्षणा सावंत, दयानंद कारबोटकर, गोपाळ सुर्तीकर, सुभाष मळीक, कालिदास गावस, नगराध्यक्षा सिद्धी पोरोब, सर्व पंचायतीचे सरपंच, पंच, नगरसेवक, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लीकर यांनी स्वागत करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले. राज्यात विक्रमी सदस्य निर्माण करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.

जास्तीत जास्त सदस्य करा 

प्रत्येक घरात जाऊन त्यांचे विचारपूस करून सदस्यत्व बहाल करताना जास्तीत जास्त सदस्य कसे होतील व त्यांना भाजपच्या कार्याची ओळख करून देऊ सदस्यत्व करण्यासाठी प्रयत्न करा. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी अधिक कार्यकर्ते जोडण्याचा दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

Web Title: bring development to the last element of society reach every household through membership drive said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.