गोव्यात ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:14 AM2018-12-20T11:14:01+5:302018-12-20T11:14:10+5:30
पणजीहून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण येथील पारोळ्ळे समुद्र किनाऱ्यावर आज भल्या पहाटे एका ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
- अरविंद टेंगसे
काणकोण(गोवा)- पणजीहून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण येथील पारोळ्ळे समुद्र किनाऱ्यावर आज भल्या पहाटे एका ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही महिला काणकोण रेल्वे स्टेशनवरून पारोळ्ळे येथे आपल्या हॉटेलकडे चालत जात होती. ती रेल्वेनं जाण्यासाठी स्टेशनवर गेली होती. परंतु रेल्वे उशिरा असल्यानं माघारी परतील, पहाटे साडेचार वाजता रस्त्यावरून चालत जात असताना कोणी तरी तिला शेजारच्या शेतात ढकललं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचं तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नोंदवलं आहे.
रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित बलात्कार व्यक्तीचं छायाचित्र सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पारोळ्ळेपासून काणकोण रेल्वे स्टेशन दीड किलोमीटर अंतरावर आहे. याच पारोळ्ळेनजीक दीड वर्षापूर्वी एका स्वीडनच्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एका स्थानिकावर न्यायालयात खटला चालू आहे. आता ब्रिटिश महिलेवर बलात्कार करणाराही संशयित स्थानिक असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, तपास करत आहेत.