गोव्यातील लाला की बस्तीवर बुलडोझर अटळ

By वासुदेव.पागी | Published: November 1, 2023 03:57 PM2023-11-01T15:57:35+5:302023-11-01T15:58:01+5:30

थीवी येथील कोमूनीदादच्या मालकीच्या जमिनीत केलेली अतिक्रमणे हटविण्याचाआदेश, म्हणजेच कथित लाला की बस्ती पाडण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्याने दिला होता.

Bulldozers at Lala Ki Basti in Goa | गोव्यातील लाला की बस्तीवर बुलडोझर अटळ

गोव्यातील लाला की बस्तीवर बुलडोझर अटळ

पणजीः थिवी येथील कोमुनीदादच्या जमिनीत उभारण्यात आलेली बेकायदेशीर लालाकी बस्ती पाडण्याच्या आदेशाच्या विरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली आहे. या बस्तीवर बुलडोझर फिरविला जाणार हे निश्चितझाले आहे.

थीवी येथील कोमूनीदादच्या मालकीच्या जमिनीत केलेली अतिक्रमणे हटविण्याचाआदेश, म्हणजेच कथित लाला की बस्ती पाडण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्याने दिला होता. त्या आदेशाला या वस्तीतील काही लोकांनी प्रशासकीय लवादाकडे आव्हान दिले होते. प्रशासकीय लवादाने आव्हान अर्ज फेटाळल्यानंतर याचिकादार अयुब खान व इतरांनी उत्तर गोवा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सत्र न्यायालयाने या प्रकरणात सविस्तर सुनावणी घेऊन १५-१२-२०१९ रोजी निवाडाजारी करताना आव्हान याचिका फेटाळली होती. त्यामुळे याचिकादाराने खंडपीठातधाव घेतली होती. न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर यायाचिकेवर सुनावणीपूर्ण होऊन २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निवाडा राखून ठेवलाहोता. हा निवाडा बुधवारी जाहीर करण्यात आला. 

आव्हान याचिका फेटाळताना न्यायालयाने उभय बाजूने केलेल्या युक्तीवादांवर सविस्तरस्पष्टीकरण दिले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेला आदेश हा नैसर्गिक न्यायाच्याविरोधात असल्याचा याचिकादाराचा युक्तीवाद खंडपीठाने खोडून काढताना याचिकादाराला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी व वेळ दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या जमिनीवरील बांधकामे कायदेशीर करण्याची प्रक्रिया सुरू असताना ती पाडण्याचा आदेश दिल्याचा युक्तीवाद हा या ठिकाणी तर्कसंगत नसल्याचे म्हटले आहे. कारण अशा प्रकारची बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ही केवळ दि. १५ -६-२०००पूर्वीच्या बांधकामासाठी लागू होत आहे, आणि ही वस्ती त्या नंतरची असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

Web Title: Bulldozers at Lala Ki Basti in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा