गोवा पोलीसांना बुलेटप्रूफ  जेकेट्सची ७ वर्षांपासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 09:31 PM2018-01-03T21:31:40+5:302018-01-03T21:31:43+5:30

गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट देण्यात येणार असल्याचे ७ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी गोव्यात तीन सरकारे पाहिली परंतु अद्याप बुलेटप्रूफ जॅकेट्सचा प्र्ताव एक इंचभरही पुढे सरकलेला नाही. 

Bulletproof jackets waiting for 7 years for Goa police | गोवा पोलीसांना बुलेटप्रूफ  जेकेट्सची ७ वर्षांपासून प्रतीक्षा

गोवा पोलीसांना बुलेटप्रूफ  जेकेट्सची ७ वर्षांपासून प्रतीक्षा

Next

पणजी:  गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट देण्यात येणार असल्याचे ७ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पोलीसांनी गोव्यात तीन सरकारे पाहिली परंतु अद्याप बुलेटप्रूफ जॅकेट्सचा प्र्ताव एक इंचभरही पुढे सरकलेला नाही. 
२६/११च्या मुंबईवरील दहश्तवादी हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारीही मारले गेल्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेट्सचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच मुद्यावर नंतर देशभरातील पोलीस खात्यांकडू बुलेटप्रूफ जॅकेट्सची मागणी करण्यात आली. गोवा पोलिसांना बुलेटप्रूफ जेकेट्स देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळी सरकारने केली. त्यासाठी पलीस खात्याकडून सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आले. हे प्रस्ताव गेली काही वर्षे गृहखात्यात पडून आहे. 
प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर किरकोळ दुरुस्त्याही सुचविण्यात आल्या होत्या आणि फाईल पुन्हा पोलीस खात्याकडे पाठविण्यात आली होती. दुरुस्त्या करून पुन्हा गृहखात्याकडे पाठविण्यात आलेली फाईल अजून तशीच पडून आहे. 
या विषयी विचारले असता पोलीस महासंचालक मुक्तेश् चंदर यांनी सांगितले की गोव्या सारख्या लहान राज्यासाठी ही समस्या सतावणे स्वाभाविक आहे. कारण कमी बुलेटप्रूफ जेकेट्सचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार पुढे येऊ पाहत नाहीत. कारण दर परवडत नाहीत असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Bulletproof jackets waiting for 7 years for Goa police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.