गोव्यात दफनभूमीची तोडफोड
By Admin | Published: July 10, 2017 01:46 PM2017-07-10T13:46:39+5:302017-07-10T13:49:55+5:30
गोव्यातील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीची काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना समोर येते आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 10- गोव्यातील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीची काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना समोर येते आहे. दक्षिण गोव्यातील कुरचोरे कस्बेच्या ईसाईमधील दफनभूमीचा काही भाग अज्ञातांनी तोडला आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. तसंच त्या दफनभूमीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तो़डफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गोव्यातील गार्डीयन अँजल सेमेटरी या दफनभूमीतून काही स्थानिकांनी एका व्यक्तीला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बाहेर पडताना पाहिलं होतं. या प्रकरणाचा विविध अनुषंगाने तपास सुरू झाला आहे, अशी माहितीही पोलीस अधिकारी शिवराम वायंगणकर यांनी दिली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यातील संवेदनशील भागात पोलिसांना गस्तीचे आदेश दिले आहेत. तसंच गस्तीमध्ये पोलिसांना मदत करण्यासाठी दक्षिण गोव्यामधून भारतीय रिझर्व्ह बटालियनच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
आधी स्वत:कडे पहा, सुषमा स्वराजांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा केला उघड
प.बंगालमधील जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात
US Visa - वैद्यकीय अहवालाची मुदत संपली तर काय करायचं?