जलवाहिनी फुटल्याने बार्देशातील पुरवठ्यावर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:42 PM2023-11-28T17:42:50+5:302023-11-28T17:44:10+5:30
तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे.
काशिराम म्हांबरे
एका बाजूने तिळारी धरणातून अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पाला होणारा पुरवठा कालव्यांच्या दुरुस्ती तसेच देखभालीसाठी बंद करण्यात आला असताना दुसरीकडे थिवी येथेतालुक्याला पुरवठा करणारी ७०० एमएमची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पुरवठा बंद करुन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे भाग पडले आहे. घडलेल्या प्रकारातून होणाºया पाणी पुरवठ्यावर त्याचे परिणाम झालेआहेत.
तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बार्देशातील पुरवठ्यात ४० टक्केघट झाली होती. त्यात भर म्हणून आज मंगळवारी अस्नोडाहून तालुक्याला पुरवठा करणारी मुख्य वाहिनी थिवी येथेसुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान फुटली. त्यानंतर पुरवठा बंद करुन दुरुस्ती हाती घेणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाला भाग पडले. दुरुस्ती सुरु होई पर्यंत लाखो लिटर पाणी मात्र वाया गेले होते. म्हापसा, कळंगुट, शिवोली, हळदोणा साळगांव सारख्या भागातील पुरवठ्यावर परिणाम झाले आहेत.
खात्याचे सहाय्यक अभियंता तृप्तेश शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार पाईपची जोड असलेल्या ठिकाणातून पाण्याची गळती सुरु झाली होती. पुरवठा बंद करुन दुरुस्ती हाती घेण्यात आली असून दोन तासात दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची संभावना आहे. त्यानंतर पुरवठा सुरळीत होणार असल्याचे शिरसाट म्हणाले. त्यामुळे तालुक्यातील पुरवठा उद्या बुधवारपर्यंत सुरळीत होण्याची संभावना त्यांनी व्यक्त केली.