चालत्या बसमधून पडून बसमालकाचा मृत्यू

By admin | Published: June 16, 2017 02:05 AM2017-06-16T02:05:54+5:302017-06-16T02:05:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कसांगे : चालत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने शिरवई-केपे येथील बसमालक तथा वाहक नारायण रायकर (६५) हे बसमधून बाहेर

The bus driver dies due to a moving bus | चालत्या बसमधून पडून बसमालकाचा मृत्यू

चालत्या बसमधून पडून बसमालकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगे : चालत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने शिरवई-केपे येथील बसमालक तथा वाहक नारायण रायकर (६५) हे बसमधून बाहेर फेकले गेले व रस्त्यावरील साकवाच्या कमानींना डोके आदळल्याने ते गंभीर जखमी झाले. लगेच सांगे आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत रायकर हे निवृत्त शिक्षक होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कामाक्षी (जीए 0२ वाय ५५८६) ही प्रवासी बस सांगे बसस्थानकावरून दुपारी १२.३५ वा. मळकर्णे येथे जायला निघाली. दांडो येथील जंक्शनवर या बसमध्ये काही प्रवासी चढल्यावर ही बस पुन्हा प्रवासाला निघाली. काही अंतर पुढे गेल्यावर वळणावर या बसचा मुख्य दरवाजा अचानक उघडला व दरवाज्यावर उभे असलेले रायकर तोल जाऊन खाली पडले. बस त्यावेळी साकवावरून जात होती. त्यामुळ साकवावरील लोखंडी कमानींवर रायकर यांचे डोके आदळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी लगेच त्यांना सांगे येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
सांगेचे निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेश गावकर यांनी पंचनामा केला व मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविला.
सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांना या घटनेची माहिती मिळताच सांगे आरोग्य केंद्रात भेट दिली व कुडचडे येथील शववाहिका मागवली. मयत नारायण रायकर यांना दीड वर्षापूर्वी तिळामळ येथे अपघात झाला होता. त्या अपघातातून ते सावरले होते. पाच-सहा महिन्यांपासून ते पुन्हा आपल्या बसवर वाहक म्हणून काम करीत होते.

Web Title: The bus driver dies due to a moving bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.