गोव्यात बायोगॅसवर धावणार बसगाड्या, देशातील पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 09:29 PM2017-08-14T21:29:31+5:302017-08-14T21:35:39+5:30

बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करुन त्यावर चालणा-या बसगाड्यांचा देशातील पहिला प्रयोग गोव्यात होत आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी केली असून बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणा-या दोन बसगाड्यांचा शुभारंभ राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते उद्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे.

Bus trains running on biogas in Goa, the country's first experiment | गोव्यात बायोगॅसवर धावणार बसगाड्या, देशातील पहिला प्रयोग

गोव्यात बायोगॅसवर धावणार बसगाड्या, देशातील पहिला प्रयोग

Next

पणजी, दि. 14 - बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करुन त्यावर चालणा-या बसगाड्यांचा देशातील पहिला प्रयोग गोव्यात होत आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी केली असून बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणा-या दोन बसगाड्यांचा शुभारंभ राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते उद्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे. या बसगाड्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रदूषण निर्मूलनाच्यादृष्टिने तो मैलाचा दगड ठरणार आहे. 
कदंब महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी या बसगाड्यांबाबत अनेक वैशिष्ट्ये सांगितली. याच कंपनीच्या बायो इथॅनॉलवर चालणा-या बसेस सध्या नागपूर महापालिकेच्या ताफ्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. 
पूर्णपणे वातानुकुलीत असलेली ही बस ३७ आसनी असून इंजिन मागील बाजूस आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि जीपीएस सिस्टम असल्याने बस नेमकी कुठे आहे हे ट्रॅक केले जाऊ शकते. या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता अशी व्यवस्था आहे की बसचे फ्लोरिंग खाली घेता येते. गतिरोधक आला किंवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले असल्यास फ्लोरिंग एक फूट वर घेता येते.
 साधारणपणे एक टन कच-यापासून २५ क्युबिक मिटर बायोगॅस तयार होतो. प्रती क्युबिक मिटर साधारणपणे अडीच किलोमिटर बस धावू शकते. याचाच अर्थ २५ क्युबिक मिटर गॅस इंधन म्हणून वापरला तर त्यातून ६0 ते ६२ किलोमिटर मायलेज मिळू शकते. कदंब महामंडळाच्या ताफ्यात सध्या ५00 हून अधिक बसगाड्या आहेत.

Web Title: Bus trains running on biogas in Goa, the country's first experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.