बसेस बंद, भाजी दाखल
By Admin | Published: September 27, 2015 02:52 AM2015-09-27T02:52:32+5:302015-09-27T02:52:45+5:30
पणजी : म्हादई नदीचे पाणी शनिवारी पुन्हा पेटले. शेतकरी आणि सुमारे नऊशे कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
पणजी : म्हादई नदीचे पाणी शनिवारी पुन्हा पेटले. शेतकरी आणि सुमारे नऊशे कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे कळसा-भांडुरा जलस्रोतांचे पाणी मलप्रभा नदीद्वारे उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांना पुरविणारी योजना तत्काळ सुरू करून कर्नाटकला पाणी द्यावे, या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात हा बंद पुकारला होता. बंद असला तरी बेळगावहून शनिवारी भाजी मात्र गोव्यात पोहोचली, तर संभाव्य नुकसान लक्षात घेऊन कदंब वाहतूक महामंडळाच्या बसेस मात्र कर्नाटकमध्ये पाठविल्या नाहीत.
बेळगावचे भाजी मार्केट तेवढे खुले होते. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाकडून रोज मोठ्या प्रमाणात बेळगावहून गोव्यात भाजी आणली जाते. शनिवारी फलोत्पादन महामंडळासाठी भाजी घेऊन गाड्या गोव्यात पोहचल्या. महामंडळाचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांना या प्रतिनिधीने विचारले असता, ते म्हणाले की, आमच्या भाजीच्या गाड्या गोव्यात येण्याबाबत अडथळा आला नाही. आम्ही गाड्या थोड्या लवकरही सोडल्या होत्या. कदंब वाहतूक महामंडळाने मात्र शनिवारी एकही बसगाडी कर्नाटकमध्ये पाठवली नाही. बेळगाव, हुबळी, बागलकोट, कारवार आदी ठिकाणी कदंब वाहतूक महामंडळाच्या रोज पंचवीस बसगाड्या ये-जा करतात. पणजी : म्हादई नदीचे पाणी शनिवारी पुन्हा पेटले. शेतकरी आणि सुमारे नऊशे कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे कळसा-भांडुरा जलस्रोतांचे पाणी मलप्रभा नदीद्वारे उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांना पुरविणारी योजना तत्काळ सुरू करून कर्नाटकला पाणी द्यावे, या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात हा बंद पुकारला होता. बंद असला तरी बेळगावहून शनिवारी भाजी मात्र गोव्यात पोहोचली, तर संभाव्य नुकसान लक्षात घेऊन कदंब वाहतूक महामंडळाच्या बसेस मात्र कर्नाटकमध्ये पाठविल्या नाहीत.
बेळगावचे भाजी मार्केट तेवढे खुले होते. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाकडून रोज मोठ्या प्रमाणात बेळगावहून गोव्यात भाजी आणली जाते. शनिवारी फलोत्पादन महामंडळासाठी भाजी घेऊन गाड्या गोव्यात पोहचल्या. महामंडळाचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांना या प्रतिनिधीने विचारले असता, ते म्हणाले की, आमच्या भाजीच्या गाड्या गोव्यात येण्याबाबत अडथळा आला नाही. आम्ही गाड्या थोड्या लवकरही सोडल्या होत्या. कदंब वाहतूक महामंडळाने मात्र शनिवारी एकही बसगाडी कर्नाटकमध्ये पाठवली नाही. बेळगाव, हुबळी, बागलकोट, कारवार आदी ठिकाणी कदंब वाहतूक महामंडळाच्या रोज पंचवीस बसगाड्या ये-जा करतात.