गोवा मुक्ती लढ्यासाठी उद्योगपती व खनिज मालकांनीही मदत केली नाही : सिनारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 07:07 PM2017-12-19T19:07:59+5:302017-12-19T19:08:34+5:30

गोवा मुक्तीची चळवळ चालू होती त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. निधीहीची खूप चणचण असायची.

Businessmen and miners have not helped too for Goa Liberation fight: Sinari | गोवा मुक्ती लढ्यासाठी उद्योगपती व खनिज मालकांनीही मदत केली नाही : सिनारी

गोवा मुक्ती लढ्यासाठी उद्योगपती व खनिज मालकांनीही मदत केली नाही : सिनारी

Next

पणजी : गोवा मुक्तीची चळवळ चालू होती त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. निधीहीची खूप चणचण असायची. गोव्यात त्यावेळीही मोठे व्यापारी, धनिक उद्योगपती आणि खाण व्यवसायिक होते पण त्यांनी गोवा मुक्तीच्या चळवळीवेळी स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली नाही. ते पोतरुगीजधार्जीणो नव्हते पण भीतीमुळे ते मदतीसाठी आले नाहीत, असा अनुभव ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी प्रभाकर सिनारी यांनी मंगळवारी सांगितला.

गोवा मुक्ती दिनानिमित्त लोकमतच्या येथील कार्यालयात संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिनारी यांचे आत्मचरित्र नुकतेच इंग्रजी व मराठीत प्रसिद्ध झाले आहे. लोकमतच्या संपादकीय विभागातील कर्मचा:यांशी संवाद साधताना सिनारी यांनी गोवा मुक्ती लढय़ातील अनेक थरारक अनुभव सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची गाथा त्यांनी समोर ठेवली. अस्नोडा गावाने गोवा मुक्तीच्या चळवळीत खूप त्याग केला आहे. बाळा मापारी हे मुक्ती लढय़ातील पहिले हुतात्मा आहेत पण मुक्त गोव्याने त्यांची जेवढय़ा प्रमाणात दखल घ्यायला हवी होती, तेवढी ती घेतली नाही अशी खंतही सिनारी यांनी व्यक्त केली. मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून मुक्तीलढय़ात सक्रिय झालो. विद्यार्थी दशेत एका मोर्चावेळी पोतरुगीज पोलिसांचा अमानुष अत्याचार अनुभवला. मुक्ती लढय़ात सक्रिय झाल्यानंतर मी स्वत: सतरा वर्षे घरी पोहचू शकलो नव्हतो. विश्वनाथ लवंदे, मोहन रानडे, नारायण नाईक वगैरे अनेकांनी एकत्रितपणो पोतरुगीजांविरुद्धच्या सश क्रांतीमध्ये भाग घेतला. हल्ल्यांमध्ये भाग घेतला. रात्रीच्यावेळी आम्हाला केवळ पेज जेवून रहावे लागत होते. काहीवेळा पोतरुगीजांविरुद्ध हल्ल्यांसाठी आम्हाला स्फोटकांची खूप गरज भासायची. त्यावेळी खनिज व्यवसायिक त्यांच्या खाणींवर स्फोटके वापरायचे पण आम्ही मागून देखील आम्हाला त्यांनी कधी ती दिली नाही. अर्थात पोतरुगीज त्रस करतील अशी भीती त्यांना वाटायची असे सिनारी म्हणाले. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी एकदा स्वातंत्र्य चळवळीसाठी म्हणून पैसे देऊ केले होते पण आम्ही पैसे नको तर तुमच्या वेळगेतील खाणीवरील स्फोटके द्या, अशी विनंती केली होती पण बांदोडकर यांनी स्फोटके देण्याचा धोका पत्करला नाही असे सिनारी यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले. गोवा मुक्तीची चळवळ अत्यंत शेवटच्या टप्प्यात आली तेव्हा थोडी मदत धनिकांनी केली असेल असेही ते म्हणाले.

मुक्तीनंतर गोव्यातील आणि देशातीलही कुठच्याच भागातील स्वातंत्र्य सैनिकांनी स्वत:साठी पेन्शन योजनेची मागणी केली नव्हती. स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या काही भागांमध्ये स्वातंत्र्यसैनिक मुक्तीनंतरही भोगत असलेल्या हालअपेष्टा पाहिल्या व दरमहा शंभर रुपये अशा पद्धतीने त्यांनी पेन्शन योजना सुरू केली. गोव्यातही त्यानंतर ही योजना सुरू झाली, असे सिनारी यांनी सांगितले. गोव्यात एखादे स्मारक किंवा संग्रहालय तयार व्हायला हवे. नव्या पिढीला त्यातून गोवा मुक्ती लढय़ाचा सगळा इतिहास कळून येईल. आग्वाद तुरुंग किंवा अन्य कुठेही ते करता येईल. मी आत्मचरित्र लिहिताना तडजोड केली नाही. ते प्रमाणिकपणो लिहिले व स्पष्ट आणि सत्य लिहिल्यामुळे कदाचित काहीजणांची मने दुखावलेली असतील तर त्याबाबत मी माफी देखील मागतो, असे सिनारी म्हणाले. गोवा मुक्तीनंतर मी पोलिस उपाधीक्षक म्हणून सेवेत रुजू झालो. मुक्तीनंतर झालेल्या निवडणुकीत अनेक स्वातंत्र्यसैनिक उतरले तरी, माझा काही त्या निवडणुकीशी संबंध आला नाही, असे सिनारी यांनी सांगितले. मी विद्यार्थी दशेत हायस्कुलमध्ये असताना माङया शिक्षकाला पोतरुगीजांनी प्रचंड मारहाण केली. त्या दिवशी 19 जून होता. मी त्याच दिवशी पोतरुगीजांविरुद्ध कायम लढण्याचा निर्धार केला. सातारा व अन्य भागांतील क्रांतीकारकांची आम्हाला खूप मदत झाली, असे सिनारी यांनी सांगितले.

Web Title: Businessmen and miners have not helped too for Goa Liberation fight: Sinari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.