'वाघ हत्त्या रोखण्यासाठी वनखाते जास्त कॅमेरे खरेदी करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 07:15 PM2020-01-18T19:15:21+5:302020-01-18T19:41:17+5:30
कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या गोव्यातील म्हादई अभयारण्यात नुकतीच एका वाघिणीची
पणजी : म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघांची हत्त्या रोखण्यासाठी जास्त कॅमेरे लावण्याची गरज आहे. वनखाते जास्त कॅमेरे खरेदी करेल. कॅमेरे लावण्याच्या उपायासह अन्य काही उपाययोजनाही वन खात्याने विचारात घेतल्या आहेत, असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनपाल संतोषकुमार यांनी लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीवेळी सांगितले.
कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या गोव्यातील म्हादई अभयारण्यात नुकतीच एका वाघिणीची व तिच्या तीन बछडय़ांची हत्त्या झाली. त्यांच्यावर विषप्रयोग केला गेला. 2क्क्9 साली एका वाघाची हत्त्या केरी- सत्तरी येथे झाली होती. या पाश्र्वभूमीवर बोलताना संतोषकुमार म्हणाले, की आम्ही म्हादई अभयारण्यात कॅमेरे लावलेले आहेत. शेतक:यांच्या गुरांवर वाघ हल्ला करतात व मग त्यापैकी एखादे कुटूंब विषप्रयोग करून वाघांची हत्त्या करते हे धक्कादायकच आहे. कॅमेऱ्यामध्ये काही घटना टिपल्या गेल्या आहेत. मात्र, कॅमेऱ्यांची संख्या कमी आहे. काहीवेळा अभयारण्याच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींकडून कॅमेरेच पळविले जातात. आपली कृती कॅमेऱ्यात दिसून येऊ नये म्हणून काहीजण कॅमेरे नष्ट करून टाकतात. यापुढे रात्रीच्यावेळीही वन रक्षकांनी अभयारण्यात रहायला हवे, अशा प्रकारची तरतुद आम्ही करू.
संतोषकुमार म्हणाले, की रात्रीच्यावेळी वन रक्षक स्वत:च्या घरी गेलेले असतात. वाघांची हालचाल ही रात्रीच्यावेळी जास्त होते. त्यासाठी अभयारण्यात तंबू ठोकून वन रक्षकांनी रहायला हवे. देशात जिथे व्याघ्र क्षेत्र आहे, तिथे रात्रीच्यावेळी वन रक्षक तंबू ठोकून राहतात. त्यामुळे त्यांना वाघांविषयी सगळी माहिती मिळत असते. वन रक्षकांची संख्याही आमच्याकडे कमी आहे. ती वाढविली जाईल. म्हादई अभयारण्यात सध्या तीन वाघिणी शिल्लक आहेत. अलिकडेच जो नवा वाघ दिसला, तो कर्नाटकमध्येही दोन वर्षापूर्वी कॅमेऱ्यात दिसून आला होता. वाघांचे रक्षण करण्याचा विषय वन खात्याने खूप गंभीरपणेच घेतला आहे. हत्त्येची चौकशीही गंभीरपणो केली गेली.