जागेसाठी कसरत कशाला? काढा ऑनलाइन तिकीट; कदंब महामंडळाकडून अॅपची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:16 AM2023-11-27T10:16:20+5:302023-11-27T10:18:42+5:30
क्यूआर कोड स्कॅन करून करा बुकिंग.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आता कदंब बसमध्ये जागा पकडायला कसरत करायची गरज नाही. आपण ऑनलाइन तिकीट बुक करू शकतो. कदंब महामंडळाने आता स्वतःचे अॅप व क्यूआर कोड जारी केले आहे. आपण बसस्थानकावर असताना तसेच घरी कुठेही असताना तिकीट बुकिंग करून शकतो. अॅपवर आपण बसचे तिकीट बुक करू शकतो. त्यामुळे आता कदंबमध्ये सीट पकडण्यासाठी लोकांना धावपळ कसरत करावी लागणार नाही.
ऑनलाइन अॅप
कदंब महामंडळाने आपला अॅप तयार केले असून या अॅपद्वारे आपण आपल्याला कुठेच मार्गावरून प्रवास करायचा आहे. त्यामुळे या कदंबच्या बसची माहिती मिळते. तसेच आपल्याला कुठल्या वेळच्या बसमधून प्रवास करायचा त्या याची माहिती मिळते. त्यामुळे आपण घरी असताना तसेच कार्यालयात असताना तिकीट बुक करू शकतो. तसेच या अॅपवर कुठल्या भागात, कुठली बस जाणार आहे, तसेच बसची वेळ काय असेल याची माहिती दिली जाते.
तिकीट काढण्यासाठी क्यूआर कोड आता बसमध्ये तिकिटासाठी सुट्टे पैसे नाहीत असे होणार नाही. बसमध्ये असलेला क्युअर कोड स्कॅन करून आपण तिकीट काढू शकतो. हा क्यूआर कोड बसमध्ये तसेच सर्व बसस्थानकावर आहे. त्यामुळे लोकांना आता खास तिकीट देण्यासाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही. कदंब महामंडळाने बसमध्ये अनेक बदल केले आहेत. पण अजूनही लोकांना या क्यूआर मार्फत तिकीट काढायला कळत नसल्याचे याचा जास्त उपयोग होताना दिसत नाही.
ऑनलाइन बुकिंगची सुविधा
पूर्वी लोकांना असेच बसच्या सीटसाठी धावाधाव करावी लागत होती. लवकर येणाऱ्यांना सीट मिळत होती. तर उशिरा येणाऱ्यांना बसमध्ये उभे राहावे लागत होते. मात्र आता जर आपण ऑनलाइन तिकीट बुकिंग केले असेल तर बसमध्ये उभे राहण्याची गरज नाही. आपल्याला बसमध्ये सीट मिळायला हवे असेल तर अगोदरच तिकीट बुक करू शकतात. - कदंब महामंडळाच्या अधिकारी.