मंत्रिमंडळ फेरबदल निकट; कामत, सिक्वेरा यांना संधी शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:20 AM2023-04-22T10:20:04+5:302023-04-22T10:20:49+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला हिरवा कंदिल दाखवला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

cabinet reshuffle imminent in goa bjp govt and chances for digambar kamat and sequeira | मंत्रिमंडळ फेरबदल निकट; कामत, सिक्वेरा यांना संधी शक्य

मंत्रिमंडळ फेरबदल निकट; कामत, सिक्वेरा यांना संधी शक्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: आठ काँग्रेस फुटीर आमदारांपैकी दिगंबर कामत व आलेक्स सिक्वेरा या दोघांना मंत्रिपद देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ फेररचना केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. काल 'लोकमत'शी बोलताना मंत्रिमंडळ
फेरबदलाबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, मंत्रिपद कुणाला दिले जाईल ते मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला हिरवा कंदिल दाखवला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. गेल्या रविवारी फर्मागुडी येथे जाहीर सभेच्या आधी शाह हे दिगंबर यांच्याशी तब्बल दहा मिनिटे स्वतंत्रपणे बोलले होते. त्यांनी कामत यांना दिल्लीला बोलावले असून, पुढील एक-दोन दिवसांत ते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायलाच हवा, असा निर्धार भाजपने केला. अल्पसंख्याकांचे एकही मत भाजपव्यतिरक्त इतरत्र जाता कामा नये, यासाठी कामाला लागा, असा आदेश शाह यांनी पक्षाच्या प्रत्येक आमदार मंत्र्याला दिला होता. दक्षिण गोवा मतदारसंघात सासष्टी हा ख्रिस्तीबहुल तालुका असून, या तालुक्यातून सावंत सरकारमध्ये एकही मंत्री नाही. कुडतरीचे अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सुरुवातीलाच सरकारला पाठिंबा दिला तेव्हा त्यांना सासष्टीचा प्रतिनिधी म्हणून मंत्रिपद दिले जाईल, असे सर्वांना वाटले होते; परंतु त्यांना केवळ औद्योगिक विकास महामंडळ देण्यात आले. त्यानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये अन्य सात काँग्रेस आमदारांसह दिगंबर कामत यांनी भाजपप्रवेश केला तेव्हा कामत यांच्या रूपाने सासष्टीतील वजनदार नेता भाजपला मिळाला. 

कामत हे याआधी पर्रीकर सरकारात मंत्री होते. शिवाय काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी कामगिरी केली आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्येही कामत यांचे चांगलेच वजन आहे. फर्मागुडीतील जाहीर सभेत अमित शाह यांनी कामत यांना बरेच महत्त्व दिले होते, ते मुख्यमंत्र्यांसह स्थानिक नेते शाह यांच्यासोबत फोटो काढतानाही लोकांच्या नजरेस आले होते. दिगंबर यांचे मंत्रिमंडळात स्थान निश्चित झाल्याचे मानले जात आहे. 

होय, फेरबदल होणार

मंत्रिमंडळ फेरबदल निकट आहेत का? असे या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत होकारार्थी दुजोरा दिला. काँग्रेस फुटिरांपैकी किती जणांना मंत्रिमंडळात स्थान देणार किया किती जणांना वगळणार याबाबत काही स्पष्ट करण्यास त्यांनी नकार दिला.

- नुवेचे आमदार, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचेही मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते.

- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मतदारांना संतुष्ट करण्यासाठी सिक्वेरा यांचे मंत्रिपद निश्चित झाले आहे.

- प्राप्त माहितीनुसार काँग्रेस- मधून फुटतानाच त्यांना भाजप नेत्यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. ते आता पूर्ण केले जाणार आहे.

- फुटिरांपैकी दोघांना जर मंत्रिमंडळात स्थान द्यायचे झाले, तर दोन मंत्री वगळावे लागतील. हे दोन मंत्री कोण ते अजून स्पष्ट झालेले नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: cabinet reshuffle imminent in goa bjp govt and chances for digambar kamat and sequeira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.