मंत्रिमंडळ फेरबदल रखडणार; कर्नाटकातील धक्कादायक निकालामुळे नेतेमंडळी चिंतनात मग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 08:35 AM2023-05-15T08:35:53+5:302023-05-15T08:38:00+5:30

कर्नाटकातील धक्कादायक निकालांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मंत्रिमंडळ फेरबदल रखडणार आहे.

cabinet reshuffle will stop shocking result in karnataka has left the leaders in contemplation | मंत्रिमंडळ फेरबदल रखडणार; कर्नाटकातील धक्कादायक निकालामुळे नेतेमंडळी चिंतनात मग्न

मंत्रिमंडळ फेरबदल रखडणार; कर्नाटकातील धक्कादायक निकालामुळे नेतेमंडळी चिंतनात मग्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: कर्नाटकातील धक्कादायक निकालांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मंत्रिमंडळ फेरबदल रखडणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या वाढदिनी गोव्यात कर्नाटक विधानसभा निकालानंतर मंत्रिमंडळ फेररचना होणार असल्याचे सांगितले होते. परंतु, भाजपला या निवडणुकीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निकाल भाजप नेत्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. भाजपचे केंद्रीय नेते या अपयशाची कारणमिमांसा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आगामी काळात गोव्यातील नेत्यांना ते वेळ देऊ शकतील की नाही, हा प्रश्न आहे.

आठ काँग्रेसी फुटीर आमदारांपैकी पहिल्या टप्प्यात नुवेंचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. दिगंबर कामत यांचेही नाव मंत्रिपदासाठी घेतले जात होते. फर्मागुडी येथे जाहीर सभेच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कामत यांच्याशी तब्बल दहा मिनिटे स्वतंत्रपणे बोलले होते.

सासष्टी तालुक्यात एकही मंत्री नाही. हा ख्रिस्तीबहुल तालुका असून, अल्पसंख्यकांचे प्रतिनिधी म्हणून आलेक्स सिक्वेरा यांना प्राधान्य दिल जाणार होते. लोकसभा निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मतदारांन संतुष्ट करण्यासाठी सिक्वेरा यांचं मंत्रिपद निश्चित झाले होते कर्नाटकच्या निकालांमुळे भाजपच्य पदरी घोर निराशा आल्याने आत पुढील काही महिने या निकालाची कारणमिमांसा करण्यातच व्यस्त असतील. त्यामुळे तूर्त काही महिने तरी मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार नाही, असेच संकेत मिळत आहेत.
 

Web Title: cabinet reshuffle will stop shocking result in karnataka has left the leaders in contemplation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.