मुंबईतील तरुणाला कळंगुटमध्ये अमली पदार्थासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 04:16 PM2018-11-30T16:16:36+5:302018-11-30T16:21:47+5:30
कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रिगन कुटो असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो अंधेरीचा रहिवासी आहे.
म्हापसा - कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतील एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रिगन कुटो असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो अंधेरीचा रहिवासी आहे. 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाकडून 60 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. हा तरुण कळंगुट परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती समजतात त्याला पकडण्यासाठी उपनिरीक्षक महेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची स्थापना करुन सापळा रचण्यात आला. रिगन कुटो हा परिसरात दाखल होताच पोलिसांनी त्याला पकडले.
Goa: Calangute police today arrested a 21-year-old man from Mumbai in posession of narcotics during a raid conducted near Calangute market. Case registered, investigation underway
— ANI (@ANI) November 30, 2018
कुटोची झडती घेतली असता त्याच्याजवळ अमली पदार्थ सापडले. त्यामध्ये 30 हजार रुपये किंमतीचे चरस तसेच 30 हजार रुपये किंमतीचे एमडीएमके मिळून 60 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतल्यानंतर त्याला कळंगुट पोलीस स्थानकात आणून अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली. शनिवारी तरुणाला रिमांडासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. उत्तर गोव्याचे अधीक्षक उत्कर्ष प्रसून तसेच उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निरीक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.