कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे विविध याेजना व पुरस्कारांसाठी अर्जांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 03:04 PM2024-06-08T15:04:50+5:302024-06-08T15:05:08+5:30
२६ जुलै २०२४ पर्यंत अर्जधारकांनी हे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
पणजी : कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे २०२४-२५ वर्षासाठी विविध याेजना पुरस्कारसाठी अर्जांचे आवाहन केले आहे. यात गोमंत विभूषण पुरस्कार २०२३ - २४, गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४-२५, गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार उत्कृष्ट संस्था २०२४-२५, कला गौरव पुरस्कार २०२४-२५, गोवा राज्य उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार २०२४-२५, युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन चेतना पुरस्कार) २०२४ - २५, डी. डी. कोसंबी रिसर्च फेलोशिप २०२४ - २५, या पुरस्कारांचा समावेश आहे.
विविध योजनांसाठीही आवाहन.
यामध्ये २०२४ -२५ वर्षासाठी गोवा आणि भारताबाहेरील कोणत्याही कला आणि संस्कृती क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत, २०२४ - २५ वर्षासाठी कला सन्मान योजना (कलाकाराला आर्थिक मदत), गोव्यातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांना आर्थिक मदत २०२४ -२५, नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थांना (नियमित अनुदान) २०२४-२५ साठी देखभाल अनुदान (सर्व जुन्या, तसेच नवीन संस्थांना अनुदानासाठी अर्ज भरावे लागतील), गोवा राज्य ग्रामपंचायत स्वयंसेवी संस्थेची ग्रंथालये आर्थिक साहाय्य योजना २०२४-२५.
त्याचप्रमाणे भजन/ गायक/ सांस्कृतिक गट/ संस्थांना संगीत वाद्यांच्या खरेदीसाठी अनुदान मदत स्वरूपात आर्थिक साहाय्य प्रदान करण्याची योजना, गोव्यातील उत्सवी रंगभूमीच्या उन्नतीसाठी योजना, गोवा मांड संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी आर्थिक साहाय्य अशा विविध योजनांसाठी अर्ज मागितले आहेत. २६ जुलै २०२४ पर्यंत अर्जधारकांनी हे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. वरील सर्व योजनांसाठी माहिती www.artandculture.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.