भल्या पहाटे ड्रग्स विकायला आला अन् पकडला गेला!

By वासुदेव.पागी | Published: March 22, 2024 07:36 PM2024-03-22T19:36:43+5:302024-03-22T19:37:04+5:30

पहाटे ४ वाजता हा माणूस ड्रग्स घेऊन बसस्टँडवर पोहोचला होता. 

Came to sell drugs early in the morning and got caught | भल्या पहाटे ड्रग्स विकायला आला अन् पकडला गेला!

भल्या पहाटे ड्रग्स विकायला आला अन् पकडला गेला!

पणजी: गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडून (क्राईम ब्रँच) कळंगुट बस स्टँडजवळ छापा टाकून १.८५ लाख रूपये विदेशी ड्रग्ससह एका पश्चीम बंगालमधील संशयिताला अटक केली आहे. लोकांची वर्दळ सुरू होण्यापूर्वी आणि पोलीस यंत्रणे सुस्त असण्याची जास्त शक्यता आहे अशा वेळी म्हणजेच साधारणपणे पहाटे ४ वाजता हा माणूस ड्रग्स घेऊन बसस्टँडवर पोहोचला होता. 

अलीमु मंडल (२०) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून १. ८५ लाख रुपये किमतीचा ८.१३३ ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज जप्त केला आहे.    कळंगुट परिसरात एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करण्यासाठी गुरुवार, २१ रोजी रात्री येणार असल्याची माहिती गुप्तहेरांकडून क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता.    

निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संदीप मडकईकर, नित्यानंद हळर्णकर, कॉन्स्टेबल संदेश कांबळे, सैमुल्ला मकंदर, स्वप्निल सीमेपुरुषकर, सुदेश माडकर यांच्या टीमने  शुक्रवार, २२ रोजी रात्री उशिरापासूनच तिथे गुप्तपणे पहारा ठेवला होता.  पहाटे ४ दरम्यान कळंगुट बस स्टँडजवळ सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद फिरणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि त्याची झडती घेतली. या झडतीत   त्याच्याजवळ १.८५ लाख रुपये किंमतीचा ८.१३३ ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडला. त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Came to sell drugs early in the morning and got caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा