नोटीस रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची न्यायालयात धाव
By वासुदेव.पागी | Published: April 25, 2023 07:21 PM2023-04-25T19:21:33+5:302023-04-25T19:21:39+5:30
या नोटीसेनंतर केजरीवाल यांनी पेडणे पलीस स्थानकात जाणार असल्याचे विधान केले होते.
पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध पेडणे न्यायालयाने पेडणे पोलीस स्थानकात २७ एप्रील रोजी चौकशीस पेडणे पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी जारी केलेल्या नोटीसेला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे केली आहे.
गोवा विधानसभा निवडणुका काळात पोस्टर व रंगकाम करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या तक्रारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरुद्ध निवडणूक काळात गोवा निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आल्या होत्या. निवडणुकी नंतर ही प्रकरणे सबंधित पोलीस स्थनकांकडे सोपवून कार्यवाही करण्याचा आदेश आयोगाने दिला होता. केजरीवाल यांच्या विरुद्धची तक्रार पेडणे पोलिसांना सोपविण्यात आली होती.
या नोटीसेनंतर केजरीवाल यांनी पेडणे पलीस स्थानकात जाणार असल्याचे विधान केले होते. परंतु आता पेडणे न्यायालयाच्या नोटीसीला केजरीवाल यांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर हे प्रकर असले तरी एक सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणात आपल्यापुढे सुनाणी घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. हे प्रकरण द्विसदस्यीय खंडपीठाकडे सुनावणीसाठी न्यावे असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणात तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी केजरीवाल यांनी केले आहे. या प्रकरणात २६ रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.