कळंगुट येथे गांजा जप्त; संशयित सापळ्यात अडकला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:30 PM2024-01-30T16:30:05+5:302024-01-30T16:30:42+5:30

कारवाईसाठी उपनिरीक्षक  परेश सिनारी नेतृत्वाखाली यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ही कारवाई केली.  

Cannabis seized at Calangute; Suspect trapped, case registered | कळंगुट येथे गांजा जप्त; संशयित सापळ्यात अडकला, गुन्हा दाखल

कळंगुट येथे गांजा जप्त; संशयित सापळ्यात अडकला, गुन्हा दाखल

कशिराम म्हांबरे -

म्हापसा: सिकेरी-कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून संशयित इब्राहीम पस्तूनी ( वय ४५, रामनगर- पर्वरी) याला अटक करुन त्याच्याकडून ९२ हजार रुपये किंमतीचा ९२० ग्राम गांजा जप्त केला आहे. कळंगुटचे निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी उपनिरीक्षक  परेश सिनारी नेतृत्वाखाली यांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ही कारवाई केली.  

संशयित अमंली पदार्थ ग्राहकाला देण्यासाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध होताच त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाकडून सापळा रचण्यात आलेला. संशयित ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना रचलेल्या सापळ्यात अडकला व त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कार्य उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या देखरेखीखाली सुरु करण्यात आलेआहे.

 

Web Title: Cannabis seized at Calangute; Suspect trapped, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.