कर्नाटकी डाव उधळला

By admin | Published: September 13, 2015 03:01 AM2015-09-13T03:01:19+5:302015-09-13T03:01:52+5:30

म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकाने शनिवारी पुन्हा अरेरावी केली. कणकुंबी येथे आंदोलकांनी म्हादईचा बांध फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र गोव्याने

Carnatic wan breaks out | कर्नाटकी डाव उधळला

कर्नाटकी डाव उधळला

Next

म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकाने शनिवारी पुन्हा अरेरावी केली. कणकुंबी येथे आंदोलकांनी म्हादईचा बांध फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र गोव्याने सतर्कतेने वेळीच हस्तक्षेप केला. परिणामी ही अरेरावी कर्नाटकाच्या पोलिसांनी हाणून पाडली. या घटनेनंतर कणकुंबीत असलेले कुडगोळचे आमदार सी. एस. शिवल्ली यांनी कर्नाटकाची मागणी मान्य न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात ‘चलो दिल्ली’ आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. कर्नाटकाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची डरकाळी त्यांनी फोडली. दरम्यान, आंदोलकांच्या गटातील दोघे दुचाकीने जाताना जावेरी येथे अपघातात सिद्धांता तलवार हा कार्यकर्ता मरण पावला, तर एका जखमीवर केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत.
कर्नाटकातील काँग्रेसचे विविध नेते व शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून गोव्याच्या सीमेवर कणकुंबी येथे धरणे धरले आहे. या आंदोलकांनी शनिवारी पदयात्रा काढली. म्हादईचे पाणी वळवण्याबाबत केंद्र व राज्य सरकार तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा कर्नाटकाचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी तर चक्क बांधाची बंद केलेली दारे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोव्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क केल्याने वेळीच पोलीस बंदोबस्त वाढवल्याने आंदोलकांचा हा डाव फसला.
गोव्याने म्हादईचा विषय लवादासमोर प्रभावीपणे मांडल्यानंतर लवादाने कर्नाटकाला ३१ मे २०१४ रोजी कालव्याची दोन्ही दारे (तोंडे) बांध घालून बंद करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे कर्नाटकाने कार्यवाही केली. (पान २ वर)

Web Title: Carnatic wan breaks out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.