कर्नाटकच्या साक्षीदाराकडून पुन्हा दिशाभूल
By Admin | Published: May 19, 2017 02:49 AM2017-05-19T02:49:31+5:302017-05-19T02:54:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कडिचोली : गोव्यातर्फे अॅड. आत्माराम नाडकर्णी आणि टीमने घेतलेल्या उलटतपासणीत कर्नाटकचे साक्षीदार गोसाईन यांनी दिशाभूल करणे,
लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली : गोव्यातर्फे अॅड. आत्माराम नाडकर्णी आणि टीमने घेतलेल्या उलटतपासणीत कर्नाटकचे साक्षीदार गोसाईन यांनी दिशाभूल करणे, खोटी उत्तरे व आकडेवारी सादर करण्याची मालिका सुरूच ठेवली आहे.
या सुनावणीतही चुकीची माहिती व तफावत असणारा अहवाल सादर करण्यात आल्याचे सुनावणीच्या वेळी दिसून आले. २०१७ चा नव्या विश्लेषणात गुरुवारी (दि. १८) साक्षीदाराची उलट तपासणी केली असता, चार ते पाच वेळा नवी समीकरणे, आकडेवारी व जल उपलब्धतेचा अहवाल नव्याने मांडून लवादाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न के ला.
गोव्यातर्फे अॅड. नाडकर्णी यांनी २०१५ व २०१७ या दोन्ही अहवालात कशी तफावत आहे, हे लवादाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, साक्षीदाराने या तफावती शुल्लक असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. २०१७ चा अहवाल हा नव्या माहितीवर आधारित असल्याचे साक्षीदाराने सांगताच, ही माहिती २०१४ साली लवादासमोर सादर करण्यात आल्याचे नाडकर्णी यांनी निदर्शनास आणून दिले.
गुरुवारच्या सुनावणीत आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लवंदे, प्रदीप वेणुगोपाल, पंकज वेर्णेकर, साल्वादोर रिबेलो, चेतन पंडित, प्रेमानंद कामत, गोपीनाथ देसाई, सुरेश बाबू आणि दिलीप आदी सहभागी झाले होते. उलट तपासणी शुक्रवारी देखील चालू राहणार आहे.