हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल दोन मुलींविरुद्ध गुन्हा

By वासुदेव.पागी | Published: April 19, 2023 06:30 PM2023-04-19T18:30:30+5:302023-04-19T18:30:50+5:30

पणजी: माफिया आतिक अहमद खून प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडियावर आक्षेपहार्य  पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल क्राईम ब्रँचने दोन ...

Case against two girls for hurting sentiments of Hindus in Goa | हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल दोन मुलींविरुद्ध गुन्हा

हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल दोन मुलींविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

पणजी: माफिया आतिक अहमद खून प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडियावर आक्षेपहार्य  पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल क्राईम ब्रँचने दोन मुलींच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. 

sara_xec_ आणि shazia_777 अशा दोन इन्स्टाग्राम खात्यावरून आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आले आहेत. ही दोन्ही खाती डेव पब्लीक स्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन बहिणींचे आहेत अशीही माहिती उघडकीस आली आहे. आतिक अहमद हत्या प्रकरणात हे पोस्ट  करण्यात आले आहेत. या मुलींनी शिवलिंगाबद्दल अत्यंत गलिश्च शब्धात टीपण्णी केली आहे. इतर आक्षेपार्ह मजकूरही टाकला आहे.  या पोस्टना सोशल मिडियावर लोकांनी तीव्र हरकत घेतली आहे. काहींनी त्या पोस्टचे स्क्रीन शॉट मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,  गोव्याचे  पोलीस महासंचालक जसपाल सिंग तसेच क्राईम ब्रँचचे अधीक्षक  निधीन वालसान यांनाही टॅग करून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. अधीक्षक वालसान यांनी सोशल मिडियावरच याला प्रतिसाद देताना या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती देणारा कमेंट  टाकला आहे. 
क्राईम ब्रँचकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता  कलम १५३ ए (३४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात  आला आहे.

पोस्ट प्रोफाईलही गायब
या प्रकरणात एफआयआर नोंद झाल्याची माहिती क्राईम  ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी सोशल मिडियावरच कमेंटमध्ये टाकल्यानंतर इन्स्टाग्रामवरील त्या पोस्टही रद्द क रण्यात आल्या आणि प्रोफाईलही गायब झाली आहे. परंतु स्क्रीनशॉटच्या आधारावर या प्रकरणात तपास सुरू आहे. सायबर क्राईम विभागाचीही मदत घेण्यात आली आहे.

Web Title: Case against two girls for hurting sentiments of Hindus in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.