सात वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणात ११ वर्षीय मुलाला पाठवलं बालसुधारगृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 09:31 PM2019-08-16T21:31:24+5:302019-08-16T21:40:22+5:30
वास्को शहरात असलेल्या कोसंबी इमारतीच्या मागच्या बाजूतील मोकळ्या जागीच सापडलेल्या सात वर्षीय मुलाच्या मृत्यू मागचे कारण पोलीसांसमोर उघड झाले असून ह्या प्रकरणात पोलीसांनी एका ११ वर्षीय मुलाला ताब्यात घेतला आहे.
वास्को: वास्को शहरात असलेल्या कोसंबी इमारतीच्या मागच्या बाजूतील मोकळ्या जागीच सापडलेल्या सात वर्षीय मुलाच्या मृत्यू मागचे कारण पोलीसांसमोर उघड झाले असून ह्या प्रकरणात पोलीसांनी एका ११ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. वास्कोत दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने थाटण्यात आलेल्या फेरीत फुगे विकण्यासाठी आलेल्या ११ वर्षीय मुलाने त्या ७ वर्षीय मुलाला कोसंबी इमारतीत नेल्यानंतर त्याचा लैंगिक दृष्ट्या वापर करण्याचा प्रयत्न केला असता यातून स्व:ताला वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना इमारतीवरून खाली पडल्याने त्या बालकाचा मृत्यू झाल्याचे तपासणीत उघड झाले आहे.
ह्या प्रकरणात पोलीसांनी तपास करून ११ वर्षीय मुला विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे नोंद केल्यानंतर त्याला मेरशी येथील सुधार गृहात पाठवला असल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. वास्कोत रविवारी (दि.११) संध्याकाळी सप्ताहाच्या निमित्ताने थाटण्यात आलेल्या फेरीतून एक ७ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी कुटूंबाने तसेच पोलीसांनी बरेच प्रयत्न केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी बेपत्ता झालेल्या सदर मुलाचा मृतदेह मोकळ््या जागेच अर्धनग्न अवस्थेत असल्याचे आढळून होते. ह्या सात वर्षीय मुलाच्या मृतदेहावर शवचिकित्सा केली असता त्याचा मृतदेह इमारतीवरून खाली पडल्याने झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या मुलाचा मृत्यू अपघाती झाला आहे की यामागे घातपात आहे काय हे जाणून घेण्यासाठी नंतर पोलीसांनी सर्व मार्गाने तपास करण्यास सुरवात केली. पोलीसांनी सदर मुलाच्या मृत्यू मागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी विविध मार्गाने तपास करत असतानाच वास्को सप्ताहाच्या फेरीत थाटण्यात आलेल्या दुकानातील व्यापारी, कामगार अशा १२० नागरीकांना बुधवारी (दि.१४) पोलीस स्थानकावर आणून त्यांच्याशी ह्या प्रकरणात चौकशी करत जबान्या नोंद केल्या होत्या. पोलीसांकडून तपास करण्यात येत असताना इमारतीवरून खाली कोसळून मरण पोचलेला तो ७ वर्षीय बालक रविवारी (दि.११) ह्या फेरीत फुगे विकण्यासाठी आलेल्या एका मुलाबरोबर काही वेळ असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याशी चौकशी करण्यास सुरवात केली. सुरवातीला तो ११ वर्षीय मुलगा काहीच वदला नाही, मात्र शेवटी गुरूवारी (दि.१५) त्या मुलाने सात वर्षीय मुलाच्या मृत्यू मागचे नेमके कारण पोलीसांसमोर वदले. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांना संपर्क केला असता पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या त्या ११ वर्षीय मुलाने मरण पोचलेल्या त्या बालकाच्या मृत्यू मागचे नेमके कारण उघड केल्याची माहीती दिली. रविवारी रात्री तो सात वर्षीय व अकरा वर्षीय बालक कोसंबे इमारतीच्या गच्चीवर पोचल्यानंतर त्यांनी येथे खेळण्यास सुरवात केली.
काही वेळ खेळल्यानंतर त्या अकरा वर्षीय बालकाने सात वर्षीय बालकाचा लैंगिक दृष्ट्या वापर करण्याचा प्रयत्न केला असता यास त्यांने विरोध करून येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सात वर्षीय बालक गच्चीवरून पळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दुसऱ्या बालकाला कळताच त्यांने त्या अडवण्याचा प्रयत्न केला. ११ वर्षीय बालक गच्ची च्या दरवाजावर उभा राहून त्याला येथून जाऊ देणार नसल्याचे सात वर्षीय बालकाला कळताच नंतर तो गच्चीच्या कठड्यावर चढला. त्यांने दोन्ही पाय गच्चीबाहेर काढल्यानंतर हळू खाली असलेल्या भूगटाराच्या वाहीनीला (पाईप) पकडून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. ही इमारत चार मजली असून (गच्ची पकडून) वाहीनीला पकडून तो दोन मजली खाली उतरल्यानंतर त्याचा अकस्मात तोल गेल्यानंतर खाली कोसळून नंतर त्या मुलाचा मृत्यू झाला. गच्चीवर असलेल्या त्या ११ वर्षीय मुलाने त्या ७ वर्षीय मुलाचा खाली पडून मृत्यू झाल्याचे पाहताच नंतर घटनास्थळावरून पोबारा काढला. खाली पडून मरण पोचण्यापूर्वी सात वर्षीय मुलाने आपल्या अंगावरील पेंन्ट काढली असून यामुळे त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पोलीसांना आढळल्याचे तपासणी स्पष्ट झाले. खाली पडून त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ११ वर्षीय मुलाने घटनास्थळावरून पोबारा काढण्यापूर्वी गच्चीवर असलेली त्याची पेंन्ट येथे असलेल्या खाली टाकीत फेकून नंतर येथून पोबारा काढल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. ७ वर्षीय मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या ११ वर्षीय मुलाने याबाबत कबूली दिली असल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी देऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आल्याचे सांगितले.
सात वर्षीय बालकाच्या मृत्यू प्रकरणात पोलीसांनी भादस ३४१, ३७७, ३०४ कलमाखाली तसेच पोक्सो कायद्याच्या ८ व गोबा बाल कायद्याच्या ८(२) कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. सदर प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला तो ११ वर्षीय मुलगा राजस्थान येथील मूळ रहीवाशी असल्याची माहीती पोलीसांनी देऊन मागच्या आठ वर्षापासून तो आपल्या कुटूंबासहीत सप्ताहाच्या काळात वास्कोत फुगे विकण्यासाठी येत असल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रकरणात अधिक तपास चालू आहे.वास्को पोलीसांनी सोमवारी (दि.१२) सकाळी त्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मृत्यूमागचे कारण जाणून घेण्यासाठी तपासणी करण्यास सुरवात केली. ह्या तपासणी वेळी सदर सात वर्षीय मुलगा फुगे विकणाºया त्या ११ वर्षीय मुलासहीत होता अशी माहीती पोलीसांना मिळाली. त्या दोन्ही मुलांची मैत्री झाली होती असा सुगाव पोलीसांना तपासणीच्या वेळी मिळाल्यानंतर त्याच दिवशी पोलीसांनी त्या ११ वर्षीय मुलाला तपासणीसाठी बोलवून त्याच्याशी चौकशी करण्यास सुरवात केली.
याबाबत माहीती जाणून घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांना विचारले असता त्या ११ वर्षीय मुलाला काहीच न सांगता घटना घडल्याच्या पहील्याच दिवशी पोलीस स्थानकावर बोलवल्यानंतर त्यांने कुठलाच प्रश्न केला नसतानाच ‘मी काहीच केलेले नाही, मी असले काम करणारा नाही’ असे सतत बोलायला सुरवात केली अशी माहीती दिली. त्यांने हे वाक्य सतत वापरण्यास सुरवात केल्याने पहील्याच दिवशी त्याच्यावर संशय आला अशी माहीती सावंत यांनी पुढे दिली. सात वर्षीय मुलाच्या मृत्यू मागे ह्या मुलाचा हात असल्याचा ठोस पुरावा मिळाला नसल्याने नंतर त्याला पाठवण्यात आल्याचे सांगितले. यानंतर सात वर्षीय मुलाचा शवचिकित्सक अहवाल मिळाल्यानंतर तसेच मृत्यू झालेल्या त्या मुलाला ह्या ११ वर्षीय मुलासहीत पाहील्याचे काही ठोस पुरावे मिळाल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता नंतर त्यांनी घडलेल्या घटनेबाबत माहीती उघड केल्याचे सुनिता सावंत यांनी माहीतीत शेवटी सांगितले. दरम्यान पहील्या दिवशी त्या ११ वर्षीय मुलाला चौकशीसाठी बोलवल्यानंतर त्याच्याशी चौकशी करून त्याला पाठविल्यानंतर त्यांने आपल्या कुटूंबासहीत पोबारा काढला असता तर कदाचित सात वर्षीय मुलाच्या मृत्यू मागचे कारण उघड होणे पोलीसांना कठीण बनले असते.