सायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा नोंद 

By पंकज शेट्ये | Published: December 1, 2023 04:53 PM2023-12-01T16:53:07+5:302023-12-01T16:53:38+5:30

मृत्यूप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दुचाकी चालक महम्मद अरफान खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

case has been registered against the two-wheeler driver in the death of the cyclist in goa | सायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा नोंद 

सायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा नोंद 

वास्को : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध सायकलस्वाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आंतोनियो मास्कारेन्हास (वय ७३) असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दुचाकी चालक महम्मद अरफान खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

बुधवारी पहाटे ६.४५ च्या सुमारास तो अपघात घडला. सेनावली - वेर्णा येथील रस्त्यावरून दुचाकीने भरधाव वेगाने जाताना महम्मद अरफान खान याने आंतोनियो मास्कारेन्हास या सायकलस्वाराला जबर धडक दिली. अपघातात दोघेही जखमी झाले होते. अपघातात गंभीर जखमी आंतोनियो यांच्यावर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू होते. गुरूवारी (दि. ३०) रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीचालक महम्मद अरफान खान (वय ३५, रा. चिंबल, ता. तिसवाडी) वेर्णा चर्च परिसरातील रस्त्यावरून मडगावच्या दिशेने जात होता. दुचाकीवरून सेनावली, वेर्णा रस्त्यावर पोचला त्यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्याच्या दुचाकीने समोरील सायकलवस्वार आंतोनियो (रा. शिरलीम - वेर्णा) यांना धडक दिली होती. अपघातानंतर दोघांनाही इस्पितळात दाखल केले होते.

प्रथमोपचारानंतर महम्मद याला घरी पाठवण्यात आले. गुरूवारी उशिरा रात्री आंतोनियो यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या प्रकरणी दुचाकी चालक महम्मद अरफान खान याच्याविरुद्ध भादंस कलम २७९, ३०४ ए अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंद गावकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: case has been registered against the two-wheeler driver in the death of the cyclist in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.