बागायतदारांकडून काजूची निवड तर कारखानदारांनी काजू घेणे केले बंद; अवकाळी पावसाने काजू बिया पडल्या काळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:41 PM2024-05-29T15:41:17+5:302024-05-29T15:41:53+5:30

गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत.

Cashew nuts were picked by growers while factory workers stopped taking cashew nuts; Cashew nuts turned black due to unseasonal rain | बागायतदारांकडून काजूची निवड तर कारखानदारांनी काजू घेणे केले बंद; अवकाळी पावसाने काजू बिया पडल्या काळ्या

बागायतदारांकडून काजूची निवड तर कारखानदारांनी काजू घेणे केले बंद; अवकाळी पावसाने काजू बिया पडल्या काळ्या

नारायण गावस -

पणजी: सध्या राज्यात काजू हंगाम संपला तरी ही अजून काजू बागायतदारांना काजू मिळत आहेत. पण अवकाळी पावसामुळे काजू बिया कुजल्याने काळे पडले आहेत. पण आता काजू कारखानदारांनी काजू घेणे बंद केले आहे. गाेवा बागायदारमध्ये काजू घेतले जात असले तरी त्या काजू बिया निवडल्या जात आहे. यामुळे काजू उत्पादकांना फटका बसला आहे.

बागायतदारामध्ये काजूची निवड
गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत. गावठी काजू उशीरा लागल्याने त्याचे उत्पादन आता मिळत आहे. पण पावसामुळे हे काजू बिया काळ्या झाल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांनी काजू बिया खरेदी करणे  बंद केले आहे. गाेवा बागायतदारमध्ये घेतले जात आहे पण तेथेही  काजू बिया निवडल्या जात आहेत. फक्त चांगले काजू घेतले जात आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना याचे नुकसान झाले आहे. जर १० किलो काजू विक्रीस आणले तर त्यातील ५ किलो काजू  खराब म्हणून काढले जातात.

या वर्षी अगोदरच काजूचे उत्पादन घटले आहे. यंदा ५० टक्क्यांनी काजू उत्पादन घटले त्यात दरही कमी  मिळाला. यावर्षी १११ ते ११५ पर्यंत काजू प्रती किलो दर मिळाला. गेल्या वर्षी तो १२५ हाेता. त्यामुळे काजू उत्पादकांनी निराशा व्यक्त केली. काही डोंगराळभागात काजू आता पुन्हा लागले आहेत. पण आता हंगाम संपल्याने दर मिळत नाही. काही ठिकाणी १०० रुपये प्रती किलोने  घेतले जात आहे. बागायतदारमध्ये दर असला तरी तिथे चांगल काजू घेतला जातो याचा फटका काजू उत्पादकांना बसतो. त्यामुळे  सर्वच काजू उत्पादक यंदा  नुकसानीत सापडले आहे.

काणकोणचे काजू उत्पादक सुर्यकांत वेळीप म्हणाले आमच्या कलमी काजू सुरुवातीला लागले होते. त्याला फक़्त १११ रुपये प्रति  किलाे दर  मिळाला. आता मे महिन्यात गावठी काजूचे उत्पादन मिळत आहे. पण गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया काळ्या पडल्याने कारखानदार घेत नाही. तर बागायतदारमध्ये काजू बिया  निवडल्या जात आहेत. त्यामुळे याेग्य दर मिळत नाही उलट नुकसान झाली आहे.

डिचोलीचा काजू उत्पादक  कृष्णा गावकर म्हणाले यंदा अगोदरच उत्पादन घटले त्यात दरही तुटपूंजा मिळाला. आता अवकाळी पावसाने काजू उत्पादन खराब झाले. मे पूर्ण महिना उत्पादन मिळाले असते. पण मध्येच पडलेल्या अवकाळी  पावसामुळे काजू  बिया खराब झाल्या ते आता कुणीही घेत नाही.  यामुळे आमची नुकसान झाली आहे.

Web Title: Cashew nuts were picked by growers while factory workers stopped taking cashew nuts; Cashew nuts turned black due to unseasonal rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.