गोव्यात आजपासून कॅसिनो सुरू, पर्यटकांतही वाढ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 10:51 PM2020-11-01T22:51:27+5:302020-11-01T22:53:05+5:30
लॉकडाऊननंतर पुन्हा राष्ट्रीय प्रवासी विमाने सुरू झाल्यानंतर सुरवातीला कमी प्रमाणात दाबोळीवर विमाने यायची.
पणजी - गोव्यातील कॅसिनो सुरू करण्याची परवानगी १ नोव्हेंबरपासून देण्यात आल्याने येणाऱ्या दिवसात दाबोळीवर राष्ट्रीय विमानांच्या संख्येत आणखीन वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊनपूर्वी दाबोळीवर भारतातील विविध भागातून दिवसाला सुमारे ८५ विमाने प्रवाशांना घेऊन यायची. गोव्यात येणाºया या पर्यटकापैंकी काही जण कॅसिनोत खास करून खेळण्यासाठी यायचेअशी माहीती सूत्रांनी दिली.
लॉकडाऊननंतर पुन्हा राष्ट्रीय प्रवासी विमाने सुरू झाल्यानंतर सुरवातीला कमी प्रमाणात दाबोळीवर विमाने यायची. हळू हळू करून दाबोळीवर येणाºया राष्ट्रीय विमानांच्या संख्येत वाढ होऊन शनिवारी (दि.३१) येथे विविध भागातून ३७ प्रवासी विमाने पाच हजाराहून जास्त प्रवाशांना घेऊन आल्याची माहीती प्राप्त झाली आहे. गोव्यात पुन्हा कॅसिनो चालू करण्यात आल्याने दाबोळी विमानतळावर येणाºया प्रवासी विमानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
७ नोव्हेंबरपासून गोव्यात पुन्हा उतरणार कोलकाता व इंदोरची विमाने
७ नोव्हेंबरपासून दाबोळी विमानतळावर कोलकाता व इंदोरहून प्रवासी विमानसेवा सुरू होत आहेत. लॉकडाऊनपूर्वी दाबोळीवर यामार्गावरील विमानसेवा सुरू होत्या, मात्र लॉकडाऊननंतर त्या आता प्रथमच सुरू होत असल्याचे गगन मलिक यांनी कळविले. यामार्गावरील प्रवासी विमानसेवा सुरू होत असल्याने गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला याचा फायदा होणार.