कॅसिनोंचा ओला कचरा ताळगावला

By admin | Published: August 26, 2016 02:09 AM2016-08-26T02:09:40+5:302016-08-26T02:10:45+5:30

पणजी : कॅसिनोंचा ओला कचरा विल्हेवाटीसाठी ताळगावला नेणे, रिलायन्स केबल खोदकाम प्रकरणात कंपनीकडून येणे असलेले १ कोटी २0 लाख रुपये वसूल

Cassine wet garbage Tallgawa | कॅसिनोंचा ओला कचरा ताळगावला

कॅसिनोंचा ओला कचरा ताळगावला

Next

पणजी : कॅसिनोंचा ओला कचरा विल्हेवाटीसाठी ताळगावला नेणे, रिलायन्स केबल खोदकाम प्रकरणात कंपनीकडून येणे असलेले १ कोटी २0 लाख रुपये वसूल करण्यासाठी कायदेविषयक सल्ला घेणे, परवानगीशिवाय टॉवर उभारल्यास जमीनमालकाला २ लाख रुपये आणि कंपनीला ५ लाख रुपये दंड ठोठावणे आदी महत्त्वाचे ठराव गुरुवारी महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आले. रिलायन्स प्रकरणावरून वातावरण तापले. कंपनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द पोलिसांत गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी
करण्यात आली. १५ दिवसांत पैसे न भरल्यास केबल काढून टाकू, असा इशारा महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिला.
रिलायन्स प्रकरणात चौकशी अहवाल पालिका प्रशासनाला पाठवला असल्याचे आयुक्त दीपक देसाई यांनी सांगितले. खोदकाम भरपाईसाठी ६00 रुपये प्रति
मीटर दर असताना केवळ ५0 रुपये प्रति मीटर आकारण्यात आले. कमी दर आकारण्याचा अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल नगरसेवक उदय मडकईकर व दिनेश साळगावकर यांनी केला. या प्रकरणी उपायुक्तांचे अधिकार काढून घेतले; तसेच सर्व फाईल्सही त्यांच्याकडून काढून घ्याव्यात व मोटार आणि चालकही काढून घ्यावा, अशी मागणी साळगावकर यांनी केली.
यापुढे कोणत्याही मोबाईल कंपनीला खोदकाम करू देणार नाही, असे फुर्तादो यांनी स्पष्ट केले. सोपो घोटाळ्यातील वसुली कधी करणार, असा सवाल मडकईकर यांनी
केला. मार्केटमध्ये अजूनही सोपो गोळा केला जात आहे कोणाचेही नियंत्रण नाही, असा आरोप त्यांनी केला. ओला कचरा पाटो येथे टाकण्यास मनाई असताना मनपाचाच एक चालक खाजगीत हे काम करुन पैसे उकळत आहे हा आणखी एक मोठा घोटाळा आहे आणि संगनमताने हे चालू असल्याचा गौप्यस्फोट महापौरांनी केला. या प्रकरणाच्याही मुळाशी जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.
कॅसिनोंचा ओला कचरा हाताळण्याची मनपाची क्षमता नाही. त्यासाठी हिरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस असलेला प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे, असे आयुक्त म्हणाले. त्यावर या प्रकल्पाचे काम जीएसआयडीसीकडे असताना आणि केवळ शेडवर पत्रा टाकण्याचे
क्षुल्लक काम बाकी असताना विलंब का, असा प्रश्न करण्यात आला.
(प्रतिनिधी)

Web Title: Cassine wet garbage Tallgawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.