गोव्यातील कॅटामाईन प्रकरणाचे धागेदोरे अंतरराष्ट्रीय लॉबीपर्यंत, महसूल गुप्तचर विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 11:15 PM2018-06-13T23:15:15+5:302018-06-13T23:15:15+5:30
पिसुर्ले येथे जप्त करण्यात आलेले कॅटामाईन हे अंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवहाराचाच एक भाग असल्याचे महसूल संचालनालयाने जाहीर केले आहे.
पणजी: पिसुर्ले येथे जप्त करण्यात आलेले कॅटामाईन हे अंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवहाराचाच एक भाग असल्याचे महसूल संचालनालयाने जाहीर केले आहे. गोव्यासह इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मिळून ३०८ किलो कॅटामाईन जप्त करण्यात आला. तसेच कोकेन सारखे अंमलीपदार्थही जप्त करण्यात आले आहेत.
कॅटमाईन व्यवहाराचे नेटवर्कींग हे अंतरराष्ट्रीय स्तरापासून गोव्यापर्यंत पोहोचल्याचे महसूल गुप्तचर विभागाच्या कारवाईतून उघड झाले आहे. अत्यंत गुप्तता राखून संपूर्ण देशभर या कारवाई झालय. कारवाई करताना स्थानिक पोलिसांनाही विश्वासात घेतले नव्हते. माहिती फुटू नये हाच त्यामागे हेतू असल्याची माहिती महसूल गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. ही कारवाई तीन दिवस चालू होती. देशभर टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण १० मुख्य संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यां्च्यावर एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ३ विदेशी आहेत.
रेव पार्ट्यांशी संबंध
कॅटमाईनचे बेकायदेशीर व्यवहार २०१६ पासून सुरू आहेत. गोव्यातही ते मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आढळून आल्यावर आरोग्य खात्याकडून कॅटामाईनच्या वापराबाबत नियम कडक करण्यात आले होते. रेवपार्ट्यात कॅटामाईन या पदार्थाचा ड्रग्स म्हणून मोठ्या प्राणावर वापर होत असल्याचे आढळून आले आहे. गोव्यात होणारी रेव पार्टीही त्याला अपवाद असण्याची शक्यता महसूल गुप्तचर विभागाला नाही.