स्विडीश युवक फेलिक्सच्या मृत्यूचा सीबीआयकडून पुन्हा तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 07:46 PM2019-06-25T19:46:10+5:302019-06-25T19:46:23+5:30

मारहाणीतून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष : जानेवारी 2015 मध्ये काणकोणात मृतदेह सापडला

CBI REOPENS MURDER CASE OF SWIDISH YOUTH FELIX DAHL | स्विडीश युवक फेलिक्सच्या मृत्यूचा सीबीआयकडून पुन्हा तपास

स्विडीश युवक फेलिक्सच्या मृत्यूचा सीबीआयकडून पुन्हा तपास

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: चार वर्षापूर्वी गोव्यात आला असता गूढरित्या मरण आलेल्या मात्र अनैसर्गिक मृत्यू या सबबीखाली गोवा पोलिसांनी फाईल बंद केलेल्या स्वीडिश नागरीक फेलिक्स दाहल (22) मृत्यू प्रकरणाचा सीबीआयने आता नव्याने तपास सुरु केला असून दहाल याला नेमका कशामुळे मृत्यू आला असावा याचा अंदाज घेण्यासाठी सोमवारी सीबीआयच्या पथकाने केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ञाबरोबर काणकोणात येऊन पुतळ्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिकेही घेतली.


28 जानेवारी 2015 साली पाटणो-काणकोण येथे फेलिक्सला मृत्यू आला होता. उंचावरुन खाली पडल्याने झालेल्या जखमातून त्याला मृत्यू आल्याचा दावा काणकोण पोलिसांनी केला होता. त्यानंतर या मृत्यू प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती. मात्र फेलिक्सची आई मिना फिरोन्हेन हिने आपल्या मुलाला आलेला मृत्यू हा खूनाचा प्रकार असल्याचा दावा करुन त्या प्रकरणाचा सीबीआयने तपास करावा अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते.


सीबीआयच्या सुत्रकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणो, मृत्यूपूर्वी दहाल याला मारहाण करण्यात आली होती. यातूनच त्याचा मृत्यू झाला. आपला हा तर्क किती खरा आहे हे जाणण्यासाठी दहालला नेमका कसा मृत्यू आला हे जाणुन घेण्याची गरज असल्याने न्यायवैद्यक तज्ञाच्या सहाय्याने सोमवारी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सकाळी सुरु झालेली प्रात्यक्षिकाची ही प्रक्रिया दुपार्पयत चालू होती. आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ञ आपला अहवाल सीबीआयला सादर करणार असून त्यानंतरच दहालचा हा मृत्यू अपघाती, स्वयंघाती किंवा खून हे स्पष्ट होणार आहे.


ज्या ठिकाणी चार वर्षापूर्वी दहालचा मृतदेह सापडला होता नेमक्या त्याच ठिकाणी दहालच्या वजनाचा एक पुतळा स्थानिक पोलिसांनी केलेल्या वर्णनाप्रमाणो खाली पाडून या पडण्याचा परिणाम दहालवर कसा झाला असावा असा अंदाज या प्रात्यक्षिकातून घेण्यात आला. या पथकात केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या सात तज्ञांचा समावेश होता. ज्यात प्रयोगशाळेचे संचालक, विविध विभागाचे प्रमुख, व्हिडिओग्रफर व फोटोग्राफर यांचा समावेश होता. सीबीआयच्या वतीने तपास अधिकारी असलेले पोलीस अधिक्षक अशोककुमार, निरीक्षक सखाराम परब, एक उपनिरीक्षक व एक शिपाई तसेच या मृत्यू प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणारे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांचा समावेश या पथकात होता.


जानेवारी 2015 मध्ये या स्वीडिश युवकाचा मृतदेह पाटणे येथील एका रेस्टॉरन्टजवळ खडकांच्या रस्त्यावर पहाटे 5.30 वा. सापडला होता. अंमलीपदार्थाच्या नशेत असताना तो रस्त्यावर पडून त्याचे डोके खडकावर आपटल्याने त्याला मृत्यू आल्याचा निष्कर्श काणकोण पोलिसांनी काढला होता. अनैसर्गिक मृत्यू म्हणून त्याची नोंद करण्यात आली होती. मात्र नंतर फेलिक्सच्या आईने हालचाली सुरु केल्यानंतर हे प्रकरण खून म्हणून नोंद करुन काणकोण पोलिसांनी त्याचा तपास केला होता. मात्र  खुनाचा आरोप सिद्ध होण्याइतपत पुरावे मिळाले नसल्याने ही फाईल बंद करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र फेलिक्सच्या आईने त्याला जोरदार विरोध केल्याने नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले होते. फेलिक्सच्या आईच्या दाव्याप्रमाणे, गोव्यात येण्यापूर्वी फेलिक्सने भारतातील त्याच्या मित्रकडे एक पैशांचा व्यवहार केला होता. त्यातूनच हा खून झाल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये दहाल गोव्यात आला होता त्यावेळी हा सौदा झाल्याचा त्याच्या आईचा दावा आहे.
 

Web Title: CBI REOPENS MURDER CASE OF SWIDISH YOUTH FELIX DAHL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.