गोव्यातील बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही लावणार
By admin | Published: October 11, 2016 09:18 PM2016-10-11T21:18:39+5:302016-10-11T21:18:39+5:30
कदंब वाहतूक महामंडळाच्या सर्व बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही लावल्या जातील. त्यामुळे महसुल चोरी रोखता येईल. तसेच कदंबच्या बसगाडय़ांना जीपीएस व्यवस्थाही
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 11 - कदंब वाहतूक महामंडळाच्या सर्व बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही लावल्या जातील. त्यामुळे महसुल चोरी रोखता येईल. तसेच कदंबच्या बसगाडय़ांना जीपीएस व्यवस्थाही लागू केली जाईल, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.
कदंब महामंडळाचा 36 वा वर्धापनदिन मंगळवारी साजरा झाला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कदंबचे चेअरमन कालरुस आल्मेदा आदी यावेळी व्यासपीठावर होते. मंत्री ढवळीकर म्हणाले, की जीपीएस व्यवस्थेचे अनेक फायदे आहेत. रस्त्यावर कुठेही अपघात झाला तर तो पोलिसांबरोबरच कदंब महामंडळालाही कळू शकेल.
मंत्री ढवळीकर यांनी आर्थिक सव्रेक्षण अहवालाचाही संदर्भ दिला. कदंब महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर हा अहवाल प्रकाश टाकतो. महामंडळाची स्थिती सुधारण्यासाठी सर्व कर्मचा:यांनी एकजुटीने चांगल्या प्रकारे व प्रामाणिकपणो काम करावे, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.
कदंबच्या बहुतेक बसगाडय़ा आमच्याच सरकारच्या कारकिर्दीत आणल्या गेल्या, असे मुख्यमंत्री पार्सेकर आपल्या भाषणात म्हणाले. राज्यातील सगळीच महामंडळे आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनविण्याचा व ही महामंडळे नफ्यात आणण्याचा आमचा उद्देश आहे. कदंब चालक, कंडक्टर्स व मेकनिक्स हे महामंडळाचे महत्त्वाचे घटक असून त्यांचे कल्याण करणो हे आमचे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी अनेक कदंब कर्मचारी तसेच शालांत मंडळाच्या परीक्षेत उत्कृष्ट यश प्राप्त केलेल्या कर्मचा:यांच्या मुलांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कदंबचया मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले.2018 सालार्पयत कदंब महामंडळ स्वत:च्या पायावर उभे राहील. आम्ही प्रवासी वाहतुकीचे अनेक नवे मार्ग सुरू केले आहेत, असे चेअरमन आल्मेदा म्हणाले. वाहतूक संचालक सुनील मसुरकर तसेच कदंबचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक परैरा नेटो हेही यावेळी उपस्थित होते.