राज्यात दिवाळी साजरी करा; रोशणाई करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 08:16 AM2024-01-15T08:16:54+5:302024-01-15T08:17:37+5:30

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त साखळी मतदारसंघ पूर्णतः बनलाय श्रीराममय.

celebrate diwali in the stars shine on said chief minister pramod sawant | राज्यात दिवाळी साजरी करा; रोशणाई करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

राज्यात दिवाळी साजरी करा; रोशणाई करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कित्येक वर्षे ज्या क्षणाची आपण वाट पाहात होतो, तो क्षण आता जवळ आला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत भव्य मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. हा ऐतिहासिक सुवर्णक्षण पाहण्याची संधी सर्वांना ऑनलाइन उपलब्ध करून दिली जणार आहे. 

अयोध्येतील राष्ट्र मंदिर आहे. त्यात श्रीराम विराजमान होत असल्याने राज्यात दिवाळी साजरी करा, रोराणाई करून आपला परिसर उजळवा, तसेच प्रत्येकाने आपापल्या मंदिराची स्वच्छता करा, ज्या-ज्या ज्येष्ठ नागरिकांनी श्रीराम मंदिर होण्यासाठी परिश्रम घेतले, त्यांना मान मिळाला पाहिजे, म्हणूनच सर्वप्रथम श्रीराम मंदिर पाहण्यासाठीच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना संधी दिली जाणार आहे, असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

दि. २२ रोजी आयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना दिनानिमित साखळी मतदारसंघ, तसेच ग्रामीण भागात गावातील सर्व प्रमुख मंदिर परिसरात श्रीराम मूर्ती स्थापनेनिमित्त धर्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पाळी, वेळगे, सुर्ल, आमोणा, कुडणे, न्हावेली, हरवळे व साखळी शहरातील प्रमुख मंदिरात खास कार्यक्रमांचे अयोजन केले आहे. या कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यासाठी साखळी येथील रवींद्र भवन सभागृहात खास बैठकीचे अयोजन केले होते, यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी संपूर्ण कार्यक्रमाविषयी सविस्तर महिती दिली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष रश्मी देसाई, सरपंच सामता कामत, कालिदास गावस, कृष्णा गावस, अंकुश मळीक, राजन फाळकर, शिवदास मुळगावकर, गुरुप्रसाद नाईक, देवस्थान अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आणि रामभक्त यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीत स्वागत गोपाळ सुर्लेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.

धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन मतदारसंघातील सर्व प्रमुख मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाल्यावर महाप्रसादाचे अयोजन केले आहे. सायंकाळी गावातील प्रत्येक मंदिरात टीपोत्सव साजरा होणार आहे. तसेच आपापल्या घरात प्रत्येकाने आकाशकंदील व दीप प्रज्वलित करुन दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी गोमंतकीय जनतेला केले आहे.

प्रत्येक गावात कार्यक्रम समितीची निवड

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी खास कार्यक्रम समिती निवडली आहे. घरोघरी निमंत्रणे दिली आहेत. गावात कसलेही राजकारण न करता, उत्सव साजरा होणार असून, प्रत्येकाला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व गोमंतकीयांनी या सोहळ्यात सहभागी व्हार्य, असा सूर बैठकीत उमटला.

प्रमुख मंदिरात होणार खास कार्यक्रम

पाळी, सुर्ल, कुडणे, आमोणा, न्हावेली, वेळगे, हरवळे आणि माखळी शहरातील प्रमुख मंदिरात सकाळपासून विविद्य धार्मिक व सांकृतिक कार्यक्रम मंदिर पुजारी, देवस्थान अध्यक्ष व शैक्षणिक संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. यात ओराम यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक सुट्टी

प्रभु श्रीराम यांचा मूतीं प्रतिष्ठापना सोहळा प्रत्येकाला अनुभवता दादा, वासावी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तेव्हा सर्व शिक्षक, विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. अंगणवाडी ते उच्चशिक्षित विद्यार्थी वर्ग या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
 

Web Title: celebrate diwali in the stars shine on said chief minister pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.