केंद्रासह महाराष्ट्र आणि गोवा सरकार निष्प्रभ- सनातन
By admin | Published: June 19, 2016 07:51 PM2016-06-19T19:51:40+5:302016-06-19T19:51:40+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यापासून सनातन संस्थेवर नाहक आरोप केले जात आहेत.
ऑनलाइन लोकमत
फोंडा, दि. 19 - डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यापासून सनातन संस्थेवर नाहक आरोप केले जात आहेत. या हत्येपासून सनातनच्या साधकांची छळणूक केली जात आहे. दाभोलकरांच्या हत्येशी सनातनचा कोणताही संबंध नाही. या हत्येच्या तपासाबाबत केंद्र तसेच गोवा व महाराष्ट्र सरकार पूर्ण निष्प्रभ असल्याचा आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला. रामनाथी येथे रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत अॅड. अमृतेश एन. पी., हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, अॅड. विष्णू शंकर जैन उपस्थित होते.
पुनाळेकर म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ट्रस्टतर्फे वार्षिक आर्थिक अहवाल दिला जात नव्हता. तसेच दाभोलकर ट्रस्टमार्फत बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी विकल्या होत्या. याशिवाय त्यांना नक्षलवाद्यांना पुरवण्यासाठी विदेशातून पैसा येत होता. सनातनतर्फे दाभोलकर ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची मागणीही केली होती. या गैरकारभारामुळेच सनातन संस्थेतर्फे त्यांच्या विरोधात 2010 ते 2013 पर्यंत न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातनविरोधात खोट्या साक्षी नोंदवल्या आहेत. सरकार बदलले तरी नोकरशाही बदलत नाही, त्यामुळे नोकरशाहीतले वैर कायम राहते.
अॅड. संजीव पुनाळेकर उवाच
दाभोलकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे निर्दोष
समीर गायकवाडचाही हत्या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही
सनातनच्या बदनामीसाठी वर्तमानपत्रांतून अनेक कपोलकल्पित कथा
सनातनचे साधक सर्व आरोपांतून निर्दोष सुटतील
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण नाही