न्यायालयात आव्हान देणार
By Admin | Published: March 2, 2015 01:24 AM2015-03-02T01:24:03+5:302015-03-02T01:24:18+5:30
पेडणे : किरणपाणी-आरोंदा पुलाशेजारी खनिज जेटी व कोळसा वाहतूक महाराष्ट्र पोलीस नौकेच्या संरक्षणार्थ सुरू आहे. याला केरी-तेरेखोल
पेडणे : किरणपाणी-आरोंदा पुलाशेजारी खनिज जेटी व कोळसा वाहतूक महाराष्ट्र पोलीस नौकेच्या संरक्षणार्थ सुरू आहे. याला केरी-तेरेखोल, पालये, किरणपाणी व आरोंदा येथील नागरिकांचा विरोध आहे. याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय केरी-तेरेखोल, पालये बचाव समितीने घेतला आहे, अशी माहिती निमंत्रक सचिन परब यांनी दिली.
कोळसा वाहतूक रोखण्यासाठी गोवा व महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले; परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. सविस्तर माहितीनुसार, एका खासगी कंपनीला महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने आरोंदा-किरणपाणी, तेरेखोल नदीतून लोहखनिज निर्यात व त्यानंतर बहुउद्देशीय जेटीस परवानगी दिलेली आहे; परंतु संबंधित विभागाने संबंधितांना परवानगी देताना पर्यावरणीय दुष्परिणामांचा विचार केलेला दिसत नाही. प्रदूषणामुळे शेती, बागायती नष्ट होणारच शिवाय किरणपाणी-तेरेखोल नदीचे पाणी प्रदूषित होऊन मासेमारी पूर्णपणे नष्ट होईल, अशी भीती मच्छीमार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. किनारी भागातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.
जेटी जेथे झाली आहे ती परिसरातील पूर्णपणे शेतीची जमीन आहे. शेतांच्या बांधावर व नदी किनाऱ्यावर नारळाची झाडे होती. भात व नारळ हेच त्या शेतकऱ्यांचे व बागायतदारांचे मुख्य उत्पन्न होते. शेतजमिनीचे रक्षण व्हावे म्हणून नदीकाठी भक्कम बंधारा घातला होता. त्या बंधाऱ्याचे नदीच्या लाटांपासून रक्षण व्हावे, लाटांचा जोर कमी व्हावा व बंधारा सुरक्षित राहावा, त्याची धूप होऊ नये म्हणून पूर्ण बंधाऱ्याला लागून नदीत ५० ते ६० मीटर अंतराने दगडाचे ढीग निर्माण केले होते. (प्रतिनिधी)