'चांद्रयान -४' मोहिमेद्वारे इस्रो आणणार चंद्रावरील खडकाचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2024 08:23 AM2024-05-26T08:23:38+5:302024-05-26T08:24:15+5:30

ज्येष्ठ शास्त्रज्ञ विठ्ठल तिळवी : अमेरिकन दूतावासाकडून निमंत्रित

chandrayaan 4 mission isro will bring samples of lunar rock | 'चांद्रयान -४' मोहिमेद्वारे इस्रो आणणार चंद्रावरील खडकाचे नमुने

'चांद्रयान -४' मोहिमेद्वारे इस्रो आणणार चंद्रावरील खडकाचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : मंगळावरील दुसऱ्या मोहिमेची तयारी मंगळयान-२ आधीच सुरू झाली असून, 'चांद्रयान-४' मोहिमेद्वारे इस्त्रो चंद्रावरील खडकाचे नमुने आणणार असल्याची माहिती गोवा उच्च शिक्षण परिषद आणि उच्च शिक्षण संचालनालय पर्वरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विठ्ठल तिळवी यांनी दिली.

अमेरिकन दूतावासाने अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २४८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई येथील ताजमहाल हॉटेलात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात डॉ. तिळवी यांना निमंत्रित केले होते. यंदाच्यावर्षी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची 'अमेरिका-भारत सहकार्य', अशी संकल्पना होती.

डॉ. तिळवी यांनी अमेरिकन राजदूत एरिक गार्सेटी, कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. सुष्मिता मोहांती, तसेच अवकाश संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

माहिती विश्लेषणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे

परग्रहावरील मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अमेरिकेकडे जसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसे मनुष्यबळ भारतामध्ये उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. 'मंगळयान २' आणि 'चांद्रयान-४' या मोहिमेद्वारे जी माहिती मिळणार आहे, त्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज असल्याचे डॉ. तिळवी म्हणाले.
 

Web Title: chandrayaan 4 mission isro will bring samples of lunar rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.